Posts

Showing posts from January, 2026

संत शिरोमणी रोहिदास महाराजांची ६४९वी जयंती ;

Image
संत शिरोमणी रोहिदास महाराजांची ६४९वी जयंती ; समता, मानवता व श्रमप्रतिष्ठेचा जागर  १ फेब्रुवारी २०२६ रोजी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४९वी जयंती संपूर्ण देशभरात, विशेषतः चर्मकार समाजात, मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी होत आहे. ही जयंती केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजाला समता, मानवता, स्वाभिमान आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश देणारा प्रेरणादिन ठरत आहे. जातभेद, अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी आपल्या विचारांनी समाजाला माणुसकीचा खरा अर्थ समजावून सांगितला. संत शिरोमणी रोहिदास महाराजांचा जन्म उत्तर भारतातील काशी येथे झाल्याचे मानले जाते. पंधराव्या शतकातील या थोर संताने जन्माने चर्मकार समाजातील असूनही आपल्या कर्तृत्वाने आणि विचारांनी संपूर्ण समाजाला नवी दिशा दिली. श्रमावर आधारित जीवन जगत त्यांनी “श्रम हेच खरे ईश्वरपूजन आहे” हा विचार समाजमनात रुजवला. माणसाची ओळख जातीनं नव्हे तर त्याच्या कर्माने, चारित्र्याने आणि विचारांनी होते, हे त्यांनी ठामपणे मांडले. त्यांच्या वाणीतून समता, प्रेम, बंधुता आणि मानवतेचा संदेश सातत्याने प्रव...

जावलीच्या ‘राव’ मोरे घराण्याचा तेजस्वी इतिहास पुन्हा प्रकाशात; १ फेब्रुवारीला महाडमध्ये भव्य स्नेहसंमेलन

Image
जावलीच्या ‘राव’ मोरे घराण्याचा तेजस्वी इतिहास पुन्हा प्रकाशात; १ फेब्रुवारीला महाडमध्ये भव्य स्नेहसंमेलन महाबळेश्वर प्रतिनिधी :  शिवपूर्व काळापासून आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने जावली प्रांतावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘राव’ मोरे घराण्याचा दैदीप्यमान इतिहास पुन्हा एकदा समाजासमोर मांडला जाणार आहे. ‘जावलीकर राव मोरे परिवार सामाजिक संस्था, मुंबई’ यांच्या वतीने समस्त जावलीकर ‘राव’ मोरे परिवाराचे द्वितीय स्नेहसंमेलन रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी महाड येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘ऐतिहासिक व्याख्यान – भाग दुसरा’. या व्याख्यानात मौर्य काळापासून ते जावलीकर मोरे घराण्यापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास, स्वराज्य स्थापनेपूर्वीची जावलीची राजकीय व सामाजिक स्थिती तसेच स्वराज्य उभारणीच्या काळातील संवेदनशील सत्ता-संघर्ष यांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व ज्येष्ठ इतिहासकार अप्पा परब यांच्या सुकन्या शिल्पा परब या ‘तर्क, अफवा आणि वस्तुस्थिती’ या विषयावर अभ्यासपूर्ण व संशोधनाधारित मांडणी करणार असून, इतिहासाबाब...

अहिरच्या सभेत शिवसेनेला जाहीर पाठिंबा; तळदेव गटात शिवसेना आघाडीवर

Image
अहिरच्या सभेत शिवसेनेला जाहीर पाठिंबा; तळदेव गटात शिवसेना आघाडीवर ✍️संतोष मालुसरे , तापोळा प्रतिनिधी – तापोळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळदेव गटात शिवसेना आघाडीवर दिसत असून, काल अहिर येथे झालेल्या भव्य प्रचार सभेत शिवसेनेला जाहीर पाठिंबा देण्यात आला. अहिर गाव हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आजोळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या निवडणुकीत शंभर टक्के साहेबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार गावकऱ्यांनी जाहीर सभेत एकमुखाने व्यक्त केला. अहिर, वाळणे, गावधोशी, गाढवली आणि आवळण या गावांसाठीची संयुक्त प्रचार सभा अहिर येथील केदारेश्वर मंदिरात पार पडली. या सभेला माजी आमदार दगडू दादा सकपाळ, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अजित सकपाळ व संजय शेलार यांच्यासह शिवसैनिक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर ‘शिवसेना जिंदाबाद’ आणि ‘साहेबांच्या पाठीशी आम्ही ठाम’ अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता. तापोळा–अहिर या जोड फुलामुळे कोयना विभागातील जनतेचे राहणीमान उंचावणार असून विकासाला गती मिळणार असल्याचे सभेत सांगण्यात...

महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Image
महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ मुंबई प्रतिनिधी :  महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण साकार झाला असून सुनेत्रा पवार यांनी आज, शुक्रवार ३१ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीमुळे त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. संध्याकाळी ठीक पाच वाजता मुंबईतील ‘लोकभवन’ येथे पार पडलेल्या सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या नावावर विश्वास व्यक्त केला. त्यासाठी आज दुपारी विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बालकलाकारांची दोरीवरील थरारक कसरत; महाबळेश्वरकरांसह पर्यटकांनी घेतला मनमुराद आनंद

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बालकलाकारांची दोरीवरील थरारक कसरत; महाबळेश्वरकरांसह पर्यटकांनी घेतला मनमुराद आनंद महाबळेश्वर प्रतिनिधी :  शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज दुपारच्या सुमारास बालकलाकारांनी सादर केलेल्या दोरीवरील थरारक कसरतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कौशल्य, संतुलन आणि धाडस यांचा अनोखा संगम असलेल्या या खेळांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. लहान वयातच कठीण कसरती सादर करणाऱ्या या बालकलाकारांचे स्थानिक नागरिकांनी भरभरून कौतुक करत त्यांना मनापासून साथ दिली, तर महाबळेश्वरला फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनीही या पारंपरिक लोककलेचा मनमुराद आनंद घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या वर्दळीच्या ठिकाणी दोरीवर चालणे, उंचीवर संतुलन राखत विविध हालचाली करणे, तसेच वेगवेगळ्या अंगविक्षेपांद्वारे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणे अशा कसरती बालकलाकारांनी सादर केल्या. प्रत्येक खेळानंतर उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट होत होता. काही क्षण तर प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारे ठरले. लहान वय असूनही आत्मविश्वासाने आणि कौशल्याने सादर केलेल्या या कसरतींमुळे...

कास पठारानजीक अज्ञात व्यक्तीचा गळफास; परिसरात खळबळ

Image
कास पठारानजीक अज्ञात व्यक्तीचा गळफास; परिसरात खळबळ कास प्रतिनिधी (ता. ३१) :  जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराच्या नजीक आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कास पठाराच्या मुख्य कार्यालयापुढील बाजूस, छोटा धबधबा कोसळतो त्या परिसरात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ही व्यक्ती आढळून आली. आज सकाळच्या सुमारास तेथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तत्काळ कास पठारावरील सुरक्षेसाठी असलेल्या कास समितीच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाऊन माहिती दिली. समितीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्ती झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर या घटनेची माहिती मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना फोनवरून देण्यात आली. मृत व्यक्तीच्या अंगावर पांढरा सदरा, खाली खाकी रंगाची नाईट पँट, कानाला काळी टोपी असून पायात सॉक्स व स्लीपर असल्याचे दिसून आले आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, वय आणि ...

श्री क्षेत्र महाबळेश्वरचा विकास घडवणारा नेता हरपला; ग्रामस्थांनी अश्रूंनी वाहिली अजित पवारांना आदरांजली

Image
श्री क्षेत्र महाबळेश्वरचा विकास घडवणारा नेता हरपला; ग्रामस्थांनी अश्रूंनी वाहिली अजित पवारांना आदरांजली श्री क्षेत्र महाबळेश्वर :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह महाबळेश्वर तालुक्यात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ग्रामस्थांनी भावपूर्ण वातावरणात त्यांना आदरांजली अर्पण केली. आयोजित श्रद्धांजली सभेला ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतता पाळून, अश्रूंनी डोळे भरून ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी अजित पवार यांनी महाबळेश्वरच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाच्या आठवणी ग्रामस्थांनी जाग्या केल्या. पर्यटन विकास, रस्ते, पाणीपुरवठा योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणे तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, असे उपस्थितांनी सांगितले. महाबळेश्वरचा पर्यटन नकाशावर स्वतंत्र ठसा उमटावा यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि दिलेली मदत आजही विसरता येणार नाही, अशा भावना ग्रामस्थांनी व्...

महाबळेश्वर तालुक्यासाठी विकासाचा संकल्प; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन

Image
महाबळेश्वर तालुक्यासाठी विकासाचा संकल्प; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन महाबळेश्वर प्रतिनिधी :  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेचा प्रचार अधिक तीव्र झाला असून मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचार करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने झटणारे, लोकांचे लोकनाथ आणि अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्याच्या विकासाचे खरे भाग्यविधाते असल्याची भावना प्रचारादरम्यान व्यक्त होत आहे. कोयना परिसराचे सुपुत्र असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान उंचावण्याचे काम केले असून त्यांचे नेतृत्व हे संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाचे मानले जात आहे. महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या प्रचारात शिवसेनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचा ठळक उल्लेख करत आहेत. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून...

अजितदादांच्या आठवणीने सभेत भावनांचा बांध फुटला; काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्याचे राजू शेठ राजपुरे यांचे ठाम आवाहन

Image
अजितदादांच्या आठवणीने सभेत भावनांचा बांध फुटला; काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्याचे राजू शेठ राजपुरे यांचे ठाम आवाहन कुंभरोशी  प्रतिनिधी :  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला वेग आला असून कुंभरोशी येथे पार पडलेल्या प्रचार सभेत जिल्हा बँकेचे संचालक राजू शेठ राजपुरे यांनी परखड आणि भावनिक भाषण करत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. कुंभरोशी गणाचे उमेदवार सचिन उतेकर आणि तळदेव गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना राजू शेठ राजपुरे यांनी मागील निवडणुकीत निवडून दिलेल्या जिल्हा परिषद सदस्याने पाच वर्षांत गावाला किती वेळा भेट दिली, गावासाठी नेमके काय काम केले, याचा हिशेब आता जनतेनेच घ्यायला हवा, असे ठामपणे सांगितले. निवडणुकीच्या काळातच गावात येणाऱ्या आणि मतं घेतल्यानंतर दिसेनाशा होणाऱ्या नेत्यांना पुन्हा पुन्हा संधी देण्याची सवय आपण बदलली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजपुरे म्हणाले की, अनेकदा आपण फक्त घोषणा करणाऱ्यांना डोक्यावर घेतो ...

माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांचा शिवसेना उमेदवारांसाठी तळदेव परिसरात जोरदार प्रचार

Image
माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांचा शिवसेना उमेदवारांसाठी तळदेव परिसरात जोरदार प्रचार तळदेव प्रतिनिधी :  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गट तसेच तळदेव आणि वाडा कुंभारोशी गणात शिवसेनेचा प्रचार वेग घेत असून या प्रचाराची धुरा या भागाचे सुपुत्र माजी आमदार श्री. दगडू दादा सकपाळ यांनी स्वतः हातात घेतली आहे. गावोगावी प्रत्यक्ष भेटी, सभा आणि संवादाच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत असून त्यामुळे परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल तळदेव येथे तळदेव, विवर आणि देवळी पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थांची मोठी सभा पार पडली. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सभेत गावातील पाणी, रस्ते, शेती, वीज, रोजगार आणि शासकीय कामकाजाशी संबंधित विविध अडचणी नागरिकांनी मांडल्या. त्यावर बोलताना माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेली विकासकामे लोकांसमोर मांडली. महाराष्ट्राचे नेतृत्व आपलाच माणूस करत असून त्याला एकजुटीने साथ देण्याची गरज आहे, असे सां...

चिता शांत होऊ दे… राजकारण नंतरही करता येईल

Image
चिता शांत होऊ दे… राजकारण नंतरही करता येईल दादांचं पार्थिव अजून मातीला मिळालेलं नाही, चितेची राखही थंड झालेली नाही आणि इकडे वारसदार, पदं, पक्ष, विलिनीकरण, मंत्रीपदं यांची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे. दुःखाचा औपचारिक चेहरा ठेवून आतून सत्तेची बेरीज-वजाबाकी सुरू असण्याचं हे चित्र केवळ अस्वस्थ करणारे नाही, तर लोकशाही, राजकारण आणि माणुसकी यावरच प्रश्नचिन्ह उभं करणारे आहे. दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हती, तर एक राजकीय शैली होती. निर्णयक्षमता, थेटपणा, मिश्किल टोले आणि गरज पडली तर कठोर शब्दांत जागेवर बसवण्याची ताकद — या सगळ्याचं मिश्रण म्हणजे अजीतदादा. चार दशकं त्यांनी हीच शैली जपली. त्यांच्या हयातीत त्यांच्या नावावर बोलणं, त्यांच्या मागे लपून बडबड करणं कुणाची हिंमत नव्हती. पण पाठ फिरताच जी बेताल चर्चा सुरू झाली, ती दादांच्या चाहत्यांना, समर्थकांना आणि सामान्य जनतेला संतापात ढकलणारी आहे. मिडियाला वेग हवा असतो, हे मान्य. पण वेग आणि संवेदनशीलता यामधील सीमारेषा ओलांडली तर तो वेग निर्घृण ठरतो. चिता पेटल्यानंतर काही मिनिटांतच “पुढचा कोण?”, “कोणतं पद कुणाला?”, “पक्ष कुठे जाणार?” असे...

केळघर घाटात ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, सहयाद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्स व ग्रामस्थांच्या धाडसी मदतकार्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात यश

Image
केळघर घाटात ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, सहयाद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्स व ग्रामस्थांच्या धाडसी मदतकार्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात यश महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर–सातारा मार्गावरील केळघर घाटात मंगळवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडून ट्रक चालकाचा मृत्यू झाला. मेढा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 20/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 106, 281 तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात ट्रक चालक आजीनाथ मारूती नागरगोजे वय 33 वर्षे, सध्या रा. किनी वाठार ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, मूळ रा. येवलवाडी ता. पाटोदा जि. बीड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत फिर्यादी आदित्य ज्ञानेश्वर जाधव वय 25 वर्षे, व्यवसाय ट्रक मालक, रा. किनी वाठार ता. हातकणंगले जि. कोल्हापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 2.30 वाजता मौजे मुकवली ता. जावली गावच्या हद्दीतील महाबळेश्वर ते सातारा जाणाऱ्या केळघर घाटातील रस्त्यावर मातोश्री हॉटेलपासून सुमारे 50 मीटर अंतरावर टाटा कंपनीचा केश...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा राजकारणावर मोठा परिणाम; राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना दोन दिवसांची मुदतवाढ

Image
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा राजकारणावर मोठा परिणाम; राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना दोन दिवसांची मुदतवाढ मुंबई प्रतिनिधी– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णतः बदलले असून, त्याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमात महत्त्वाचा बदल जाहीर केला असून, मतदानाच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केल्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर मर्यादा आल्या होत्या. या काळात राजकीय सभा, प्रचार फेऱ्या आणि मोठ्या प्रचार मोहिमा स्थगित करण्यात आल्या होत्या. तसेच प्रशासकीय यंत्रणा अंत्यसंस्कार, सुरक्षा व्यवस्था आणि शोकविधीच्या नियोजनात व्यस्त असल्याने निवडणूक यंत्रणेलाही अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने आधी जाहीर केलेली ५ फेब्रुवारी २०२६ रोजीची मतदानाची तारीख बदलून आता ७ फेब्रुवारी २०२६ अशी नवीन तारीख न...

तळदेव–कुंभरोशी साठी भाजपची भव्य प्रचार सभा; उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे यांची उपस्थिती

Image
तळदेव–कुंभरोशी साठी भाजपची भव्य प्रचार सभा; उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे यांची उपस्थिती महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी तीन वाजता पारसोंड, तालुका महाबळेश्वर येथील श्रीराम वरदायनी माता मंदिर परिसरात भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस माननीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले साहेब (बांधकाम मंत्री), माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब (ग्रामीण विकास मंत्री), तसेच माजी आमदार मदन दादा भोसले आणि माजी नगराध्यक्ष महाबळेश्वर डी. एम. बावळेकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तळदेव गटातील जिल्हा परिषदेचे भाजपचे अधिकृत उमेदवार सुभाष अण्णा सोंडकर आणि पंचायत समिती कुंभरोशी गणातील उमेदवार सुरेश आप्पा जाधव यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली असून, या कार्यक्रमातून भाजपच्या विकासात्मक धोरणांचा, ग्रामीण विकासाच्या कामांचा आणि भविष्यात...

कुंभरोशीमध्ये अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली; ग्रामस्थांसह राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची मोठी उपस्थिती

Image
कुंभरोशीमध्ये अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली; ग्रामस्थांसह राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची मोठी उपस्थिती कुंभरोशी प्रतिनिधी – कुंभरोशी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गावात आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली सभेत शोकाकुल वातावरण असून उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीतून सामान्य जनतेसाठी केलेले कार्य, ग्रामीण भागाशी असलेली नाळ आणि लोकहितासाठी घेतलेले धाडसी निर्णय यांची आठवण उपस्थितांनी यावेळी करून दिली. या श्रद्धांजली कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन उतेकर, सुरेश सवांत, सखाराम ढेबे, रविकांत मोरे, अनिल मोरे, विश्वनाथ गायकवाड यांच्यासह कुंभरोशी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांचे, संघर्षमय प्रवासाचे आणि जनतेशी असलेल्या थेट संवादाचे कौतुक केले. ते केवळ राजकारणी नव्हते तर शेतकर...

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महाबळेश्वरात रक्तदानाचा सामाजिक जागर; ५३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Image
प्रजासत्ताक दिनी महाबळेश्वरमध्ये रक्तदानाचा सामाजिक संदेश; रोटरी, इनरव्हील व सह्याद्री अ‍ॅडव्हेंचरचा आदर्श उपक्रम महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वर, सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर तसेच इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. या रक्तदान शिबिराची विशेष बाब म्हणजे महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेल्या पाच पर्यटकांनीही स्वयंप्रेरणेने रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे पर्यटनस्थळी येणारे नागरिकही सामाजिक जबाबदारी जपतात, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून समाजात पोहोचला. शिबिर यशस्वी करण्यासाठी महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर बापूसाहेब सांडभोर यांनी विशेष सहकार्य केले. तसेच सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन व आरोग्य तपासणीची जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडली. या उपक्रमात रोटरी क्ल...

कुंभरोशी गणात विकासाचा ठाम निर्धार; सुरेश (आप्पा) जाधव यांचा जाहीरनामा मतदारांसमोर

Image
कुंभरोशी गणात विकासाचा ठाम निर्धार; सुरेश (आप्पा) जाधव यांचा जाहीरनामा मतदारांसमोर कुंभरोशी प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील कुं भरोशी गणासाठी होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. सुरेश (आप्पा) हरिभाऊ जाधव यांनी आपला विकासाभिमुख जाहीरनामा मतदारांसमोर सादर केला आहे. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती महाबळेश्वर सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत 67 कुं भरोशी गणातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांतील सामाजिक कार्य, कामगार हक्कांसाठीचा लढा आणि ग्रामीण विकासाचा अनुभव मांडत “मी शब्दांवर नाही, कामावर विश्वास ठेवतो” असा ठाम संदेश दिला आहे. प्रतापगड, तालुका महाबळेश्वर येथील रहिवासी असलेले सुरेश जाधव हे श्री रामवरदायिनी जंगल कामगार मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन तसेच श्रीरामवरदायिनी कामगार ग्रुप, प्रतापगडचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. असंघटित कामगारांना एकत्र आणून त्यांना न्याय, सन्मान आणि सुरक्षिततेची दिशा देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून 105 गाव समाज संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या ...

मतदान यंत्रे तयारीचा कार्यक्रम उद्या; उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन

Image
मतदान यंत्रे तयारीचा कार्यक्रम उद्या; उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवार, दि. 29 जानेवारी 2026 रोजी मतदान यंत्रांची तयारी (सिलिंग व सेटिंग) करण्याचा अधिकृत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी ठीक 9 वाजता महाबळेश्वर तहसील कार्यालय येथे होणार असून सर्व उमेदवारांनी व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या कार्यक्रमात मतदान यंत्रांची तपासणी, आवश्यक सेटिंग आणि सिलिंगची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे. निवडणुकीत कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये तसेच सर्व उमेदवारांना समान व न्याय्य प्रक्रिया सुनिश्चित व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मतदान यंत्रांची तयारी उमेदवारांच्या उपस्थितीतच करण्यात येणार असल्याने कोणताही गैरसमज टाळता येणार असून निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होणार आहे. त्यामुळे सर्व संबंध...

प्रतापगडाचा बुलंद आवाज शांत; शिवप्रताप दिनाची धग जपणाऱ्या विजयाताई भोसले (ननी) यांचे निधन

Image
प्रतापगडाचा बुलंद आवाज शांत; शिवप्रताप दिनाची धग जपणाऱ्या विजयाताई भोसले (ननी) यांचे निधन सातारा प्रतिनिधी : प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक, प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात ‘ननी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ शिवप्रेमी कार्यकर्त्या विजयाताई भोसले यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्त, दुर्गप्रेमी आणि हिंदुत्ववादी चळवळीत शोककळा पसरली असून प्रतापगडावरील लढाऊ, निर्भीड आणि बुलंद आवाज कायमचा शांत झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, स्वराज्याची अस्मिता आणि शिवप्रताप दिनाचा जागर हेच विजयाताईंच्या आयुष्याचे केंद्र होते. प्रतापगडावर साजऱ्या होणाऱ्या अफझलखान वध स्मृतीदिनाला केवळ औपचारिक कार्यक्रम न ठेवता तो राज्यस्तरीय आणि सरकारी पातळीवर गौरवाने साजरा व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि ठाम भूमिकेमुळे शिवप्रताप दिनाची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि हा दिवस शिवप्रेमींसाठी अभिमानाचा बनला. प्रतापगडावरील ऐतिहासिक परिसराचे पावित्र्य ...

महाबळेश्वरवर शोककळा; ‘दादा’ हरपल्याने शहर स्तब्ध, शोकसभेत नेत्यांसह नागरिक भावूक

Image
महाबळेश्वरवर शोककळा; ‘दादा’ हरपल्याने शहर स्तब्ध, शोकसभेत नेत्यांसह नागरिक भावूक महाबळेश्वर, दि. २८ प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित ‘दादा’ पवार यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने महाबळेश्वरवर आज शोककळा पसरली. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे आणि कायम पर्यटकांनी गजबजलेले हे शहर एका क्षणात शांत झाले. दादांच्या निधनाची बातमी समजताच मुख्य बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली आणि सर्व स्तरांतील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते सुभाषचंद्र बोस चौकात एकत्र आले. येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शोकसभेत अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बारामती येथे बुधवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित दादा पवार यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच महाबळेश्वरमधील वातावरण बदलले. पर्यटन व्यवसायामुळे नेहमीच चैतन्याने भरलेले रस्ते, चौक आणि बाजारपेठा स्तब्ध झाल्या. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत दादांना मानवंदना दिली, तर हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी संघटना आणि स्थानिक रहिवाशांनीही व्य...

महाराष्ट्र शोकाकुल: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तातडीने बारामतीकडे रवाना; राज्यात शासकीय सुटीसह तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

Image
महाराष्ट्र शोकाकुल: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तातडीने बारामतीकडे रवाना; राज्यात शासकीय सुटीसह तीन दिवसांचा दुखवटा जाहीर मुंबई/बारामती: महाराष्ट्रावर आज शोककळा पसरली असून, राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम तातडीने रद्द केले असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तातडीने बारामतीला पोहोचत आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाने (CMO Maharashtra) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने आज संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुटी जाहीर केली आहे. तसेच, आदरांजली म्हणून राज्यात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे मुद्दे:  * सर्व नियोजित कार्यक्रम रद्द: मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सर्व शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रम त्वरित स्थगित केले आहेत.  * तातडीचे प्रस्थान: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विशेष विमानाने किंवा हेलिकॉप्टरने काही वेळातच बारामतीमध्ये दाखल होतील.  * राज्यात सुटी जाहीर: आज राज्यातील सर्व शासक...

महाराष्ट्र शोकाकुल: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन; बारामतीवर काळाचा घाला, राज्यात तीन दिवसांचा दुखवटा

Image
महाराष्ट्र शोकाकुल: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन; बारामतीवर काळाचा घाला, राज्यात तीन दिवसांचा दुखवटा बारामती/पुणे | २८ जानेवारी २०२६ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांच्यासह विमानात असलेल्या इतर चार जणांचाही मृत्यू झाला असून, राज्याने एक कणखर आणि कार्यक्षम प्रशासक गमावला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अपघाताचा थरार: ८:४५ ते ९:१२ दरम्यान काय घडले? आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या खासगी Learjet 45 या चार्टर विमानाने बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ८:४५ ते ९:१२ च्या दरम्यान लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीवर वेगाने घासले गेले आणि क्षणात त्याने पेट घेतला. भीषण आगीत विमानाचा अक्षरशः कोळसा झाला. या अपघातात प्राण गमावलेले: १. अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) २. वैयक्तिक सुरक्ष...

महाराष्ट्राचे दणकट नेतृत्व हरपले; अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, राज्यभर शोककळा

Image
महाराष्ट्राचे दणकट नेतृत्व हरपले; अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, राज्यभर शोककळा बारामती प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या राजकारणावर तीन दशकांहून अधिक काळ ठसा उमटवणारे, आक्रमक आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचा आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामती परिसरात लँडिंगदरम्यान झालेल्या या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील अन्य प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती प्रतिष्ठित वृत्तसंस्थांनी दिली आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 22 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या अजित पवार यांनी बारामती परिसरातून आपल्या राजकीय कारकीर्दीची पायाभरणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे असले तरी त्यांनी स्वतःच्या कामगिरीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली. सहकार चळवळ, स्थानिक संस्था, ग्रामपंचायत आणि तालुकास्तरीय राजकारणातून पुढे जात त्यांनी जनतेशी थेट नाते जोडले. बारामतीतील साखर कारखाने, सहक...

बारामतीमध्ये चार्टर्ड विमान कोसळले; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्थितीबाबत संभ्रम, प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर

Image
  बारामतीमध्ये चार्टर्ड विमान कोसळले; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्थितीबाबत संभ्रम, प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर बारामती | २८ जानेवारी २०२६ आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे एक भीषण विमान अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश असलेल्या या चार्टर्ड विमानाला लँडिंग दरम्यान अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण पसरले असून, अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत विविध माध्यमांतून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये नियोजित सभांसाठी जात होते. सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना विमानावरचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीवरून घसरून बाहेर गेले आणि मोठ्या आवाजासह क्रॅश झाले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमानाला तत्काळ आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पसरले. अजित पवार यांच्या प्रकृतीबाबतची सद्यस्थिती सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे या अपघातातील जीवितहानीबद्...

सभापतीपदाचे आरक्षण ठरतेय निर्णायक; मेटागुटाड गणात तिरंगी लढतीची रंगत

Image
सभापतीपदाचे आरक्षण ठरतेय निर्णायक; मेटागुटाड गणात तिरंगी लढतीची रंगत महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील मेटागुटाड गणातून पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण असलेल्या उमेदवाराची निवड होणार असल्याने या गणातील निवडणूक विशेष महत्त्वाची ठरली आहे. याच कारणामुळे मेटागुटाड गणातील निवडणूक अत्यंत चुरशीची व रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मेटागुटाड गण पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी चंद्राबाई वसंत चोरमले यांनी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात आता तीन उमेदवार कायम राहिले आहेत. अर्ज माघारीनंतर शकुंतला रमेश चोरमले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून, वैशाली संतोष जाधव या शिवसेनेकडून तर अमिना नदीम शारवान या भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. सभापती पदासाठीचा उमेदवार याच गणातून निश्चित होणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे. तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद लावल्याचे चित्र असून प्रचाराला वेग आला आहे. स्थानिक विकासकामे, महिला सक्षमीकरण, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण य...

भिलार गणात तिरंगी लढत निश्चित; पंचायत समिती निवडणुकीत प्रमुख पक्ष आमनेसामने

Image
भिलार गणात तिरंगी लढत निश्चित; पंचायत समिती निवडणुकीत प्रमुख पक्ष आमनेसामने महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गण पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून येथे तिरंगी लढत निश्चित झाली आहे. भिलार गणातून पंचायत समितीसाठी विविध उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात वैशाली भिलारे, कौशल्या संभाजी भिलारे आणि सविता रामचंद्र गोळे यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात आता तीन उमेदवार कायम राहिले आहेत. अर्ज माघारीनंतर भिलार गणातून पुनम निलेश गोळे या शिवसेनेकडून, वंदना प्रवीण भिलारे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर सुप्रिया अनिल भिलारे या भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या महिला उमेदवारांमध्ये थेट सामना होत असल्याने ही निवडणूक चुरशीची आणि लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण आधीच तापलेले असताना भिलार गणातील तिरंगी लढतीमुळे राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे. ...

कुंभरोशी गणात पंचरंगी लढत निश्चित; पंचायत समिती निवडणुकीत अपक्षांसह प्रमुख पक्ष आमनेसामने

Image
कुंभरोशी गणात पंचरंगी लढत निश्चित; पंचायत समिती निवडणुकीत अपक्षांसह प्रमुख पक्ष आमनेसामने महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गण पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून येथे पंचरंगी लढत निश्चित झाली आहे. कुंभरोशी गणातून पंचायत समितीसाठी एकूण सात उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी संजय रामचंद्र गायकवाड आणि धोंडीबा रामचंद्र धनावडे यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात पाच उमेदवार कायम राहिले आहेत. अर्ज माघारीनंतर कुंभरोशी गणातून सचिन श्रीरंग उतेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, सुरेश हरिभाऊ जाधव हे भारतीय जनता पक्षाकडून, संजय हरिश्चंद्र मोरे हे शिवसेनेकडून, तर समीर मधुकर चव्हाण आणि सनी अशोक मोरे हे दोघेही अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आणि दोन अपक्ष उमेदवार आमनेसामने आल्याने ही निवडणूक अधिकच चुरशीची आणि अनिश्चिततेची ठरणार असल्याचे चित्र आहे. महाबळेश्वर तालुक्यात आधीच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे वा...

तळदेव गणात चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट; पंचायत समिती निवडणुकीत राजकीय रंगत शिगेला

Image
तळदेव गणात चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट; पंचायत समिती निवडणुकीत राजकीय रंगत शिगेला महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गण पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून येथे चौरंगी लढत निश्चित झाली आहे. तळदेव गणातून एकूण आठ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीच्या प्रक्रियेत संजय रामचंद्र गायकवाड, धोंडीबा रामचंद्र धनवडे, राजेश भीमराव संकपाळ आणि पांडुरंग सदाशिव सुतार यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या चारवर येऊन ठेपली आहे. अर्ज माघारीनंतर तळदेव गणातून संजय महादेव उतेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, अभिषेक आत्माराम शिंदे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, संजय विठ्ठल शेलार हे शिवसेना शिंदे गटाकडून तर गोविंद देवजी सकपाळ हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक मैदानात कायम आहेत. चार प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार समोरासमोर आल्याने तळदेव गणातील निवडणूक चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र आहे. महाबळेश्वर तालुक्यात आधीपासूनच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे व...

महाबळेश्वर तालुक्यात भिलार गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित

Image
महाबळेश्वर तालुक्यात भिलार गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर भिलार गटातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून येथे तिरंगी लढत निश्चित झाली आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतिम उमेदवारांचे चित्र समोर आले असून निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. भिलार गट जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला एकूण सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या प्रक्रियेत सुरेश कोंडीराम सपकाळ, कांचन अभय सावंत आणि सचिन सुरेश सपकाळ यांनी आपले नामनिर्देशन अर्ज माघारी घेतले. त्यामुळे भिलार गटातून भाजपच्या रंजना संजय कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चंदर केळगणे आणि शिवसेनेचे प्रदीप विठ्ठल चपटे हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार थेट मैदानात उतरल्याने भिलार गटातील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक विकासकामे, मूलभूत सुविधा, पर्यटनाशी संबंधित प्रश्न तसेच गावपातळीवरील विविध समस्या हे मुद्द...

महाबळेश्वर तालुक्यात तळदेव गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित

Image
महाबळेश्वर तालुक्यात तळदेव गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर तळदेव गटातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून येथे तिरंगी लढत निश्चित झाली आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने आता अंतिम उमेदवार निश्चित झाले असून निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. तळदेव गट जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीच्या प्रक्रियेत रेणुका अजित संकपाळ, कृष्णा भगवान काळे, धोंडीबा रामचंद्र धनवडे आणि अभिषेक आत्माराम शिंदे यांनी आपले नामनिर्देशन अर्ज माघारी घेतले. त्यामुळे तळदेव गटातून शिवसेनेचे अजित रामचंद्र संपत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय रामचंद्र गायकवाड आणि भाजपचे सुभाष महादेव सोंडकर हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार मैदानात असल्याने तळदेव गटातील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक विकासकामे, मूलभूत सुविधा, गावातील प्रश्न आणि पक्षांची ...

नांदलमधील अनधिकृत गौण खनिज उत्खननावर अखेर कारवाईचा हातोडा; सुशांत मोरे यांच्या आमरण उपोषणाचा प्रशासनावर परिणाम

Image
नांदलमधील अनधिकृत गौण खनिज उत्खननावर अखेर कारवाईचा हातोडा; सुशांत मोरे यांच्या आमरण उपोषणाचा प्रशासनावर परिणाम सातारा – प्रतिनिधी फलटण तालुक्यातील नांदल गावच्या हद्दीतील गट क्रमांक ५९२, ५९३, ५९५, ५९६, ५९७ आणि ६३४ या क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी अखेर प्रशासनाने ठोस पाऊल उचलले असून उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी संबंधित ठिकाणी ईटीएस मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्यानंतर ही कारवाई झाली असून त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. नांदल परिसरात महसूल विभाग आणि वनविभागाच्या कथित संगनमताने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत उत्खनन व क्रशर उद्योग सुरू असल्याचा आरोप करण्यात येत होता. या उत्खननामुळे संपूर्ण परिसरात धुरळ्याचे साम्राज्य पसरले असून शेती, पर्यावरण आणि वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते. या गंभीर बाबींकडे वारंवार लक्ष वेधूनही फलटण महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सुशांत मोरे यांन...

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये महाबळेश्वर तालुक्यातील उमेदवारांनी माघारी घेतलेले अर्ज यादी

Image
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये महाबळेश्वर तालुक्यातील उमेदवारांनी माघारी घेतलेले अर्ज  यादी १. जिल्हा परिषद (निवडणूक विभागानुसार) ३४ तळदेव गट (एकूण ४ उमेदवार): १. रेणुका अजित संकपाळ २. कृष्णा भगवान काळे ३. धोंडिबा रामचंद्र धनवडे ४. अभिषेक आत्माराम शिंदे ३५ भिलार गट (एकूण ३ उमेदवार): १. सुरेश कोंडीराम सपकाळ २. कांचन अभय सावंत ३. सचिन सुरेश सपकाळ २. पंचायत समिती (गणानुसार) ६७ कुंभारोशी गण (एकूण २ उमेदवार): १. संजय रामचंद्र गायकवाड २. धोंडिबा रामचंद्र धनवडे ६८ तळदेव गण (एकूण ४ उमेदवार): १. संजय रामचंद्र गायकवाड २. धोंडीबा रामचंद्र धनावडे ३. राजेश भीमराव संकपाळ ४. पांडुरंग सदाशिव सुतार ६९ मेटगुताड गण (एकूण १ उमेदवार): १. चंद्राबाई वसंत चोरमले ७० भिलार गण (एकूण ३ उमेदवार): १. वैशाली बिपीन भिलारे २. कौसल्या संभाजी भिलारे ३. सविता रामचंद्र गोळे एकूण सारांश: जिल्हा परिषद विभाग: एकूण ०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. पंचायत समिती गण: एकूण १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस; भिलार व तळदेव गटात अपक्ष उमेदवारांची माघार, अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची प्रतीक्षा

Image
अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस; भिलार व तळदेव गटात अपक्ष उमेदवारांची माघार, अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची प्रतीक्षा महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 हा नामनिर्देशन अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी 2.23 वाजेपर्यंत विविध गट व गणांमधील एकूण आठ उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निवडणूक लढतीचे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून उर्वरित वेळेत आणखी कोण कोण अर्ज माघारी घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राप्त माहितीनुसार तळदेव गट क्रमांक 34 मधून अपक्ष उमेदवार रेणुका अजित संकपाळ यांनी आपला अर्ज माघार घेतली आहे. भिलार गट क्रमांक 35 मधून अपक्ष उमेदवार सुरेश कोंडीराम सपकाळ यांनी माघार घेतली असून भिलार गण क्रमांक 70 मधून अपक्ष उमेदवार कौसल्या संभाजी भिलारे यांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. याच भिलार गटातून अपक्ष उमेदवार कांचन अभय सावंत यांनी देखील अर्ज माघार घेतली आहे. मेटगुताड गणमधून अपक्ष उमेदवार चंद्राबाई वसंत चोरमले यांनी उमेदवारी मागे ...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!