कासच्या कुशीत साकारली निसर्गाची अद्भुत कलाकृती; ‘मंडप घळ’ नैसर्गिक पूल ठरतोय पर्यटकांचे आकर्षण!
कासच्या कुशीत साकारली निसर्गाची अद्भुत कलाकृती; ‘मंडप घळ’ नैसर्गिक पूल ठरतोय पर्यटकांचे आकर्षण! परदेशातील निसर्गरम्य ठिकाणांची आठवण करून देणाऱ्या ‘मंडप घळी’चे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच पर्यटकांची उत्सुकता वाढली कास प्रतिनिधी : निसर्गसौंदर्याने जगभरात ओळखल्या जाणाऱ्या कास पठाराच्या परिसरात निसर्गाची आणखी एक अनोखी कलाकृती पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. कास पठाराच्या परिसरातील संरक्षित वनक्षेत्रात असलेली ‘मंडप घळ’ ही नैसर्गिक खडकांची रचना सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. दगडांमध्ये नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या या कमानीसदृश रचनेला स्थानिक पातळीवर नैसर्गिक पूल किंवा ‘हिडन नॅचरल रॉक ब्रिज’ म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्यात या परिसराचे रूप अधिकच खुलून येते. पाऊस, वारा आणि नैसर्गिक झीज यामुळे खडकांमध्ये तयार झालेल्या या अद्भुत रचनेवर हिरवेगार शेवाळ आणि रानफर्नची चादर पसरते. सभोवतालची दाट हिरवाई, धुक्याची दुलई, ओलसर खडक आणि खोल दरी यामुळे संपूर्ण परिसराला एक वेगळेच निसर्गरम्य रूप प्राप्त होते. त्याम...