गोगवे गावात श्री दत्तजयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचा भव्य सोहळा
गोगवे गावात श्री दत्तजयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचा भव्य सोहळा ✍️गोगवे प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील मौजे गोगवे येथे श्री गुरुदेव दत्त जयंतीनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचा भव्य सोहळा यंदा विशेष उत्साहात आयोजित केला आहे. कै. मा.आ.जी. जी.कदम यांच्या स्मृतीने आणि आशिर्वादाने दरवर्षी पार पडणारा हा धार्मिक उपक्रम यंदा स्थापनेच्या १९९० सालापासूनच्या त्रिपूर्तीनिमित्त ३६व्या वर्षात पदार्पण करत असून भाविकांमध्ये मोठ्या उत्सुकतेचे वातावरण आहे. सोमवार दि. १ डिसेंबर २०२५ पासून ते शुक्रवार दि. ५ डिसेंबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या सप्ताही कार्यक्रमात सकाळ-सायंकाळ पारायण, हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक उपक्रमांमध्ये ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. संत साहित्यप्रेमी, देवभक्त आणि स्थानिक मंडळांच्या सहभागामुळे या वर्षीचा कार्यक्रम अधिक भव्य आणि भक्तिपूर्ण होणार असल्याचे ग्रामस्थ मंडळातर्फे सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी मा. श्री. संतोष (शेठ) मोरे , चेअरमन – गोगवे विकास सोसायटी यांनी विशेष सहकार्य दिले असून ...