गोगवे गावात श्री दत्तजयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचा भव्य सोहळा

गोगवे गावात श्री दत्तजयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचा भव्य सोहळा

✍️गोगवे प्रतिनिधी  –

महाबळेश्वर तालुक्यातील मौजे गोगवे येथे श्री गुरुदेव दत्त जयंतीनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचा भव्य सोहळा यंदा विशेष उत्साहात आयोजित केला आहे. कै. मा.आ.जी. जी.कदम यांच्या स्मृतीने आणि आशिर्वादाने दरवर्षी पार पडणारा हा धार्मिक उपक्रम यंदा स्थापनेच्या १९९० सालापासूनच्या त्रिपूर्तीनिमित्त ३६व्या वर्षात पदार्पण करत असून भाविकांमध्ये मोठ्या उत्सुकतेचे वातावरण आहे.

सोमवार दि. १ डिसेंबर २०२५ पासून ते शुक्रवार दि. ५ डिसेंबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या सप्ताही कार्यक्रमात सकाळ-सायंकाळ पारायण, हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक उपक्रमांमध्ये ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. संत साहित्यप्रेमी, देवभक्त आणि स्थानिक मंडळांच्या सहभागामुळे या वर्षीचा कार्यक्रम अधिक भव्य आणि भक्तिपूर्ण होणार असल्याचे ग्रामस्थ मंडळातर्फे सांगण्यात आले.

कार्यक्रमासाठी मा. श्री. संतोष (शेठ) मोरे, चेअरमन – गोगवे विकास सोसायटी यांनी विशेष सहकार्य दिले असून त्यांच्या योगदानाबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ग्रामस्थ मंडळ गोगवे, माऊली मंडळ गोगवे मुंबई, तसेच जिजामाता महिला मंडळ गोगवे मुंबई या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून दत्तजयंती सप्ताहाचे आयोजन अधिक देखणे होणार आहे.

श्री गणेशा,श्री भवानीशंकर, श्री हनुमंत आणि श्री दत्त यांच्या मंगलचरणासह सुरू होणारा हा पारंपरिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम गोगवे गावाच्या धार्मिक परंपरांचा सन्मान राखत भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक सहभागाचा सुंदर सोहळा ठरणार आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl