Posts

Showing posts from April, 2026

महाबळेश्वर पालिकेच्या सभेत स्वच्छतेवरून ठेकेदाराला इशारा; “दोन दिवसांत सुधारणा नाही तर ठेका रद्द”

Image
महाबळेश्वर पालिकेच्या सभेत स्वच्छतेवरून ठेकेदाराला इशारा; “दोन दिवसांत सुधारणा नाही तर ठेका रद्द” महाबळेश्वर : प्रतिनिधी महाबळेश्वर नगर परिषदेच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत शहरातील स्वच्छता व्यवस्था, अतिक्रमण, शिक्षण संस्थांतील गोंधळ आणि विविध नागरी प्रश्नांवर जोरदार चर्चा रंगली. लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष नसीरभाई मुलानी आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत एकूण २७ महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली असून त्यातील बहुतांश विषयांना मुखसंमती देण्यात आली. विरोधी पक्षनेते कुमार शिंदे यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या सभेत विविध विभागांच्या कार्यप्रणालीवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद संचालित उच्च माध्यमिक शिक्षण संस्थेतील शिक्षकांची अंतर्गत गटबाजी, वारंवार होणारी गैरहजेरी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचा मुद्दा शिक्षण सभापती रोहित ढेबे यांनी उपस्थित केला. शिक्षण संस्थांमध्ये शिस्त आणि गुणवत्तेचा अभाव निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने तातडीन...

लोन मिळवून देण्याचे आमिष; गुंगीकारक पदार्थ देत महिलेचे दीड लाखांचे दागिने व मोबाईल लंपास

Image
लोन मिळवून देण्याचे आमिष; गुंगीकारक पदार्थ देत महिलेचे दीड लाखांचे दागिने व मोबाईल लंपास महाबळेश्वर प्रतिनिधी : सातारा ते महाबळेश्वर दरम्यान एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुंगीकारक पदार्थ देऊन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. याबाबत महाबळेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता सूर्यकांत देवरुखकर (वय 32, रा. नरवन, ता. महाड, जि. रायगड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान त्या सातारा ते महाबळेश्वर या मार्गावर एसटी बसने प्रवास करत होत्या. यावेळी बसमध्ये संदीप नावाच्या अंदाजे 45 वर्षीय व्यक्तीने त्यांच्याशी ओळख वाढवत लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपीने विश्वास संपादन करून फिर्यादी महिलेला पिण्याच्या पाण्यातून काही गुंगीकारक पदार्थ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर फिर्यादी यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळ्यांचे सोन्याचे मं...

महाबळेश्वर पंचायत समितीत ६७ वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा

Image
महाबळेश्वर पंचायत समितीत ६७ वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा महाबळेश्वर प्रतिनिधी : पंचायत समिती महाबळेश्वर कार्यालयात ६७ व्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. देशभक्तीपर गीतांनी आणि विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली. या कार्यक्रमात पंचायत समिती महाबळेश्वरच्या सभापती मा. सौ. शकुंतला रमेश चोरमले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. संजय चंदर केळघणे, पंचायत समिती सदस्य मा. श्री. संजय विठ्ठल शेलार, मा. सौ. वंदना प्रवीण भिलारे, गट विकास अधिकारी वर्ग-१ मा. श्री. विजय विभुते, तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ. बुलाख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता श्री. चव्हाण यांच्यासह पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ गीताने करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण करून ध्वजगीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. मा...

प्रतापगड संवर्धनावरून सुरू असलेल्या वादांना उत्तर; “त्रुटी आढळल्यास थेट प्राधिकरणाशी संपर्क साधा” – पंकज चव्हाण

Image
प्रतापगड संवर्धनावरून सुरू असलेल्या वादांना उत्तर; “त्रुटी आढळल्यास थेट प्राधिकरणाशी संपर्क साधा” – पंकज चव्हाण ✍️जितेंद्र कारंडे, प्रतापगड प्रतिनिधी : ऐतिहासिक किल्ले प्रतापगडाच्या जीर्णोद्धार कामावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या विविध चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि शंकांना उत्तर देत प्रतापगड प्राधिकरणाचे सदस्य पंकज चव्हाण यांनी सविस्तर खुलासा केला असून नागरिकांनी अफवा आणि अपूर्ण माहितीवर विश्वास न ठेवता थेट प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. महाराष्ट्र शासनाने प्रतापगडाच्या संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी तब्बल १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून सर्व कामे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंकज चव्हाण यांनी सांगितले की, प्रतापगड हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा जिवंत वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कार्याची साक्ष देणारा हा गड केवळ पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन, संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी संरक्षण करणे...

भव्य हिंदू संमेलनाने पांचगणीत निर्माण केला एकतेचा जल्लोष; हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात सोहळा संपन्न

Image
भव्य हिंदू संमेलनाने पांचगणीत निर्माण केला एकतेचा जल्लोष; हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात सोहळा संपन्न पांचगणी प्रतिनिधी :  शहरातील गावठाण परिसरातील कै. देवजी बापू स्टेडियम येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य हिंदू संमेलन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले. हिंदू समाजातील एकता बळकट करणे, संस्कृतीची जपणूक करणे आणि समाजात जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विराट सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी साडेपाच वाजता बसस्थानकासमोरील साईबाबा मंदिरापासून निघालेल्या भव्य मिरवणुकीने झाली. ढोल-ताशांच्या गजरात, भगवे झेंडे फडकवत आणि “जय श्री राम”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. ही मिरवणूक शहराच्या मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली, जिथे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आंबेडकर उद्यान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. मिरवणुकीत पारंप...

नो एन्ट्रीचा बोजवारा! महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत वाहनांचा सुळसुळाट; पर्यटक आणि नागरिक हैराण

Image
नो एन्ट्रीचा बोजवारा! महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत वाहनांचा सुळसुळाट; पर्यटक आणि नागरिक हैराण ✍️मिलिंद काळे, महाबळेश्वर प्रतिनिधी :  पर्यटन हंगामाची सुरुवात होताच शहरातील मुख्य बाजारपेठेत पुन्हा एकदा वाहतुकीचा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. पादचारी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘नो एन्ट्री’ घोषित करण्यात आलेल्या या भागात चारचाकी आणि दुचाकी वाहनांची सर्रास वर्दळ सुरू असून नियमांचा उघडपणे भंग होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील विविध चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही मुख्य बाजारपेठेत वाहनांची मुक्तपणे ये-जा सुरू असल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे काही स्थानिक नागरिकांसह नामांकित पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचारीदेखील दुचाकी घेऊन बाजारपेठेतून जाताना दिसत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या या भागात काही वाहनचालकांकडून बेदरकारपणे वाहन चालवले जात असल्याचेही दिसून येते. मोठ्या...

“राष्ट्रमातेच्या दर्जासाठी महाबळेश्वरात गोरक्षकांचा निर्धार; हजारो स्वाक्षऱ्यांसह प्रशासनाकडे निवेदन”

Image
“राष्ट्रमातेच्या दर्जासाठी महाबळेश्वरात गोरक्षकांचा निर्धार; हजारो स्वाक्षऱ्यांसह प्रशासनाकडे निवेदन” महाबळेश्वर प्रतिनिधी : भारतीय संस्कृती, परंपरा आणि कृषीव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण आधार मानल्या जाणाऱ्या गोमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून अधिकृत दर्जा देण्यात यावा, तसेच गोवंश हत्याबंदी कायद्याची देशभरात कठोर अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाबळेश्वर येथे ‘गोसन्मान अभियान’ अंतर्गत गोरक्षक, गोपालक आणि संत-महंत यांच्या वतीने भव्य निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन महाबळेश्वर तहसीलदार यांच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल यांच्याकडे पाठवण्यात आले. या निवेदनाद्वारे गोसंवर्धन आणि संरक्षणाच्या विषयाला राष्ट्रीय पातळीवर गांभीर्याने घेण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात गोमातेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करताना, ती केवळ श्रद्धेचा विषय नसून ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि पर्यावरण यांच्याशी निगडित असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे गोमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर...

महाबळेश्वर तालुक्यात वारकरी चळवळीला नवी उभारी; विविध गावांत भजन मंडळांची स्थापना, कुंभरोशी येथे एकत्रित भक्तीमय सोहळा

Image
महाबळेश्वर तालुक्यात वारकरी चळवळीला नवी उभारी; विविध गावांत भजन मंडळांची स्थापना, कुंभरोशी येथे एकत्रित भक्तीमय सोहळा ✍️जितेंद्र कारंडे, प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यात वारकरी संप्रदायाच्या भक्तीपरंपरेला नवचैतन्य देत विविध गावांमध्ये भजन मंडळांच्या स्थापनेची चळवळ वेगाने वाढत असून पारसोंड, कुंभरोशी, दुधोशी, हातलोट, घोगलवाडी आणि बिरमणी या गावांत नव्या भजन मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, एकात्मता आणि सांस्कृतिक जागृतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पारसोंड येथे ‘आदिशक्ती श्री रामवरदायिनी भजन मंडळ’, कुंभरोशी येथे ‘जन्नी कुंभळजाई माता भजन मंडळ’, दुधोशी येथे ‘कुंभळजाई माता भजन मंडळ’, हातलोट येथे ‘श्री गावनाथ कुंभळजा प्रासादिक भजन मंडळ’, घोगलवाडी येथे ‘श्री हनुमान भजन मंडळ’ तर बिरमणी येथे ‘भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ’ अशा विविध मंडळांची स्थापना करण्यात आली. या सर्व मंडळांच्या स्थापनेमागे वारकरी परंपरेचा प्रसार, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन, हरिपाठ यांसारख्या धार्मिक उपक्...

पारसोंड येथे ‘आदिशक्ती श्री रामवरदायिनी भजन मंडळा’ची स्थापना; वारकरी परंपरेला नवी दिशा

Image
पारसोंड येथे ‘आदिशक्ती श्री रामवरदायिनी भजन मंडळा’ची स्थापना; वारकरी परंपरेला नवी दिशा महाबळेश्वर प्रतिनिधी  :  वारकरी संप्रदायाच्या भक्तीपरंपरेचा वारसा पुढे नेत सामाजिक व आध्यात्मिक एकात्मतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने पारसोंड (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे ‘आदिशक्ती श्री रामवरदायिनी भजन मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. ही स्थापना रामकृष्ण हरी वारकरी संघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून परिसरातील वारकरी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघाचे संस्थापक/अध्यक्ष ह.भ.प. श्री विश्वनाथ गरगडे, महाराष्ट्र राज्य सचिव ह.भ.प. श्री प्रकाश ओबासे तसेच सातारा जिल्हा व महाबळेश्वर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नव्या भजन मंडळाच्या माध्यमातून हरिनाम सप्ताह, कीर्तन, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून गावागावात भक्तीची जागृती करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. नवीन कार्यकारिणीनुसार श्री सुभाष शंकरराव सोंडकर यांची अध्यक्षपदी, श्री संजय आबासो मोरे यांची उपाध्यक्षपदी तर श्री दिलीप सखाराम...

कुंभरोशी येथे ‘जन्नी कुंभळजाई माता भजन मंडळ’ची स्थापना; वारकरी परंपरेला नवी उभारी

Image
कुंभरोशी येथे ‘जन्नी कुंभळजाई माता भजन मंडळ’ची स्थापना; वारकरी परंपरेला नवी उभारी कुंभरोशी प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी विभागातील वाडा येथे वारकरी संप्रदायाच्या भक्तीपरंपरेला चालना देणाऱ्या ‘जन्नी कुंभळजाई माता भजन मंडळा’ची नुकतीच स्थापना करण्यात आली. रामकृष्ण हरी वारकरी संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारला असून स्थानिक भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मंडळाच्या स्थापनेमागे सामाजिक एकात्मता, भजन-कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्मिक जागृती आणि वारकरी संस्कृतीचा प्रसार हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. संघाचे संस्थापक/अध्यक्ष ह.भ.प. श्री विश्वनाथ गरगडे, राज्य सचिव ह.भ.प. श्री प्रकाश ओबांसे तसेच सातारा जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेतून ही कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी श्री रमाकांत बाबूराव कात्रट, उपाध्यक्षपदी श्री अनिल लक्ष्मण मोरे तर सचिवपदी श्री गणेश बबन मोरे यांची निवड करण्यात आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातू...

कुंभळजाई माता भजन मंडळ दुधोशीची स्थापना; वारकरी परंपरेच्या जतनासाठी पुढाकार

Image
कुंभळजाई माता भजन मंडळ दुधोशीची स्थापना; वारकरी परंपरेच्या जतनासाठी पुढाकार महाबळेश्वर प्रतिनिधी :  वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपत सामाजिक ऐक्य आणि भक्तीभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या मार्गदर्शनाखाली दुधोशी (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे “कुंभळजाई माता भजन मंडळ” ची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या स्थापनेमुळे परिसरात धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना नवचैतन्य मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या छत्रछायेखाली ही नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संघाचे संस्थापक/अध्यक्ष ह.भ.प. श्री. विश्वनाथ गरगडे, राज्य सचिव ह.भ.प. श्री. प्रकाश ओवांस, सातारा जिल्हाध्यक्ष श्री. अरुणराव कटटे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. श्री. शंकर कृष्णा गोळे (बापूराव), जिल्हा सचिव ह.भ.प. श्री. दिलीप यादव, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष ह.भ.प. श्री. अशोकराव पोळ, जिल्हा संघटक ह.भ.प. श्री. गुलाबराव आमराळे, तसेच महाबळेश्वर तालुका अध्यक्ष ह.भ.प. श्री. जगन्नाथ आमराळे आणि तालुका ...

हातलोट येथे ‘श्री गावनाथ कुंभळजा प्रासादिक भजन मंडळा’ची स्थापना; वारकरी परंपरेला नवी ऊर्जा

Image
हातलोट येथे ‘श्री गावनाथ कुंभळजा प्रासादिक भजन मंडळा’ची स्थापना; वारकरी परंपरेला नवी ऊर्जा महाबळेश्वर प्रतिनिधी  :  वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक परंपरेला बळकटी देत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या मार्गदर्शनाखाली हातलोट येथे ‘श्री गावनाथ कुंभळजा प्रासादिक भजन मंडळा’ची स्थापना करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील वारकरी चळवळीला नवे बळ मिळणार असून भजन-कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाजजागृतीचा प्रसार होणार आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. श्री विश्वनाथ गरगडे, महाराष्ट्र राज्य सचिव ह.भ.प. श्री प्रकाश ओबासे, जिल्हाध्यक्ष सातारा श्री अरुणराव कटुटे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. श्री शंकर कृष्णा गोळे (बापूराव), जिल्हा सचिव ह.भ.प. श्री दिलीप यादव, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष ह.भ.प. श्री अशोकराव पोळ, जिल्हा संघटक ह.भ.प. श्री गुलाबराव आमराळे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष ह.भ.प. श्री जगन्नाथ आमराळे तसेच तालुका उपाध्यक्ष ह.भ.प. श्री सखाराम ढेबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्थापना जाहीर करण्यात आली. नवीन भजन मंडळाच्या अध्यक्षपद...

घोगलवाडीमध्ये श्री हनुमान भजन मंडळाची स्थापना; वारकरी परंपरेला नवे बळ

Image
घोगलवाडीमध्ये श्री हनुमान भजन मंडळाची स्थापना; वारकरी परंपरेला नवे बळ महाबळेश्वर प्रतिनिधी :  वारकरी संप्रदायाच्या परंपरेला चालना देत भक्ती, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यासाठी घोगलवाडी (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे श्री हनुमान भजन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या मंडळामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून वारकरी परंपरेच्या जतन व संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नोंदणी क्र. महा-पुणे-ई ७१३४ असलेल्या रामकृष्ण हरी वारकरी संघाचे संस्थापक व अध्यक्ष ह.भ.प. श्री विश्वनाथ गरगडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर वारकरी संप्रदायाचा प्रसार केला जात आहे. राज्य सचिव ह.भ.प. श्री प्रकाश ओवाळसे, सातारा जिल्हाध्यक्ष श्री अरुणराव कटरे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. श्री शंकर कृष्णा गोळे (बापूराव), जिल्हा सचिव ह.भ.प. श्री दिलीप यादव, कार्यकारी अध्यक्ष ह.भ.प. श्री अशोकराव पोळ, जिल्हा संघटक ह.भ.प. श्री गुलाबराव आमराळे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष ह.भ.प. श्री जगन्नाथ आमराळे तसेच ताल...

रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या प्रेरणेने बिरमणी येथे भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळाची स्थापना; वारकरी परंपरेला नवे बळ

Image
रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या प्रेरणेने बिरमणी येथे भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळाची स्थापना; वारकरी परंपरेला नवे बळ प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील बिरमणी येथे वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासण्यासाठी आणि धार्मिक-सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या माध्यमातून भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसरात भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून अध्यात्मिक वातावरण अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रामकृष्ण हरी वारकरी संघ, महाराष्ट्र राज्य (नोंदणी क्र. महा-पुणे-इ ७१२४) या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या मंडळामध्ये राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष ह.भ.प. श्री. विश्वनाथ गरगडे, महाराष्ट्र राज्य सचिव ह.भ.प. श्री. प्रकाश ओबांसे, सातारा जिल्हाध्यक्ष श्री. अरुणराव कट्टे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. श्री. शंकर कृष्णा गोळे (बापूराव), जिल्हा सचिव ह.भ.प. श्री. दिलीप यादव, कार्यकारी अध्यक्ष ह.भ.प. श्री. अशो...

कुंभरोशी येथे दुर्मिळ ‘मलेओ’ पक्ष्याचे प्राण वाचले; स्थानिकांच्या सतर्कतेमुळे जीवदान

Image
कुंभरोशी येथे दुर्मिळ ‘मलेओ’ पक्ष्याचे प्राण वाचले; स्थानिकांच्या सतर्कतेमुळे जीवदान प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी परिसरात एक अतिशय दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण ‘मलेओ’ पक्षी जखमी अवस्थेत आढळून आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर आढळणारा हा पक्षी स्थानिक शेतात सापडल्याने ही घटना विशेष लक्षवेधी ठरली आहे. कुंभरोशी येथील शेतकरी शरद सावंत यांना त्यांच्या शेतात हा पक्षी जखमी अवस्थेत दिसून आला. पक्ष्याची अवस्था पाहून त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पक्ष्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले. काही काळ उपचार आणि निगराणी केल्यानंतर पक्ष्याची प्रकृती सुधारल्याने त्याला सुरक्षितपणे पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या संपूर्ण बचाव कार्यात मनीष पवार, रुद्र बेलिडकर, गौरव बडोले, श्रेयश गारसुंड आणि शरद सावंत यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या तत्परतेमुळे एका दुर्मिळ आणि संकटग्रस्त पक्ष्याचा जीव वाचवण्यात यश आले. मलेओ हा पक्षी आ...

गवडी येथे आगीचा कहर; झोपडीसह जनावरांचे व शेतीचे मोठे नुकसान, सुमारे ६० हजारांचा फटका

Image
गवडी येथे आगीचा कहर; झोपडीसह जनावरांचे व शेतीचे मोठे नुकसान, सुमारे ६० हजारांचा फटका मेढा प्रतिनिधी  : जावली तालुक्यातील गवडी (पाटीलवाडी) येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या अचानक आगीत शेतातील झोपडी, जनावरे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गवडी येथील शेतकरी धोंडीराम लक्ष्मण पाटणे यांच्या शेतामध्ये माचूतर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक फातिमा उसेन नालबंद (वय ५५) व उसेन कासम नालबंद (वय ६०) हे भाडेतत्त्वावर शेती करत होते. शेतीकामासाठी त्यांनी शेतामध्येच गवती छपराची झोपडी उभारून वास्तव्य केले होते. शुक्रवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच दोघांनी तत्काळ प्रयत्न करून आग विझवण्य...

आंबेनळी घाटात थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; ७०० फूट दरीत कोसळलेल्या दांपत्याचे मृतदेह अखेर बाहेर

Image
आंबेनळी घाटात थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; ७०० फूट दरीत कोसळलेल्या दांपत्याचे मृतदेह अखेर बाहेर प्रतापगड प्रतिनिधी : आंबेनळी घाट येथे झालेल्या भीषण अपघातानंतर सुरू असलेली थरारक बचाव मोहीम अखेर यशस्वी ठरली असून ७०० फूट खोल दरीत कोसळलेल्या बाईकस्वार दांपत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. दोन दिवस चाललेल्या या अत्यंत कठीण आणि जीवघेण्या मोहिमेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीत हा अपघात घडला. दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अमित जाधव यांना घाटातील एका धोकादायक वळणावर रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत स्प्लेंडर मोटारसायकल आढळली. बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेली असल्याने अपघाताची शक्यता लक्षात येताच त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. रेस्क्यू टीमने दोरांच्या साहाय्याने सुमारे ७०० फूट खोल दरीत उतरून ...

आंबेनळी घाटात थरारक रेस्क्यू; मृतदेह बाहेर काढताना रात्री अडथळा बचावकार्य थांबले, आज पुन्हा सुरू होणार मोहीम

Image
आंबेनळी घाटात थरारक रेस्क्यू; मृतदेह बाहेर काढताना रात्री अडथळा बचावकार्य थांबले, आज पुन्हा सुरू होणार मोहीम प्रतापगड प्रतिनिधी :  महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात बाईकस्वार दांपत्याचा सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अंधार, अवकाळी पाऊस आणि दाट धुके यामुळे सुरू असलेले बचावकार्य अखेर रात्री सुमारे १.३० वाजता थांबवावे लागल्याने या दुर्घटनेची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ एप्रिल रोजी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अमित जाधव हे पोलादपूर ते प्रतापगड मार्गावरून जात असताना आंबेनळी घाटातील एका अतिधोकादायक वळणावर रस्त्याच्या कडेला एक स्प्लेंडर मोटारसायकल संशयास्पद स्थितीत आढळून आली. बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेली असल्याने अपघाताची शक्यता लक्षात येताच त्यांनी तत्काळ प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांना माहिती दिली. यानंतर दोन्ही पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. ...

आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; ७०० फूट दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू, बचावकार्याला पावसाचा अडथळा

Image
आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; ७०० फूट दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू, बचावकार्याला पावसाचा अडथळा प्रतापगड प्रतिनिधी   :  महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघातात बाईकस्वार दांपत्याचा सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंबेनळी घाटातील एका अतिधोकादायक वळणावर स्प्लेंडर बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेवरून बाईकवरील प्रवासी दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यानंतर तात्काळ प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोधकार्यादरम्यान सुमारे ७०० फूट खोल दरीत संबंधित दांपत्याचा मृत अवस्थेत शोध लागला. मृतांची ओळख मोहन चव्हाण (वय ५५) आणि जयश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी) अशी झाली आहे. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अ...

आंबेनळी घाटात भीषण अपघाताची शक्यता; बाईक बॅरिकेट्समध्ये अडकली, प्रवासी दरीत कोसळल्याचा संशय

Image
आंबेनळी घाटात भीषण अपघाताची शक्यता; बाईक बॅरिकेट्समध्ये अडकली, प्रवासी दरीत कोसळल्याचा संशय प्रतापगड प्रतिनिधी दि. २३ : महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात भीषण अपघाताची घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घाटातील धोकादायक वळणावर एका बाईकचा अपघात होऊन ती बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली असून संबंधित बाईकवरील प्रवासी खोल दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, सध्या परिसरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि दाट धुक्यामुळे शोधकार्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. आंबेनळी घाट हा अत्यंत धोकादायक वळणांचा घाट म्हणून ओळखला जातो. विशेषतः पावसाळी वातावरणात रस्ता घसरडा होत असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते.  दरम्यान, शोधकार्य सुरू असून अपघातग्रस्त व्यक्तीचा शोध लागता...

विनापरवाना खैर लाकूड वाहतूक प्रकरणी कारवाई; तीन आरोपी रंगेहात पकडले, वाहनासह माल जप्त

Image
विनापरवाना खैर लाकूड वाहतूक प्रकरणी कारवाई; तीन आरोपी रंगेहात पकडले, वाहनासह माल जप्त प्रतापगड प्रतिनिधी : महाड–पोलादपूर मार्गावरील चेकनाक्यावर वनविभागाने धाडसी कारवाई करत विनापरवाना खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या तिघांना रंगेहात पकडले असून मोठ्या प्रमाणात लाकूड व वाहन जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे अवैध लाकूड तस्करीविरोधात वनविभागाने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी वनरक्षक महाड–पोलादपूर चेक नाका येथे कार्यरत असलेल्या श्रीमती शालिनी कोहळे यांनी MH-01-LA-8878 क्रमांकाच्या पिकअप वाहनाला थांबण्याचा इशारा दिला असता संबंधित वाहन न थांबता वेगाने पुढे निघून गेले. संशय अधिक बळावल्याने त्यांनी तत्काळ पाठलाग करून वाहन अडवले. तपासणीदरम्यान वाहनामध्ये खैर लाकडाचा साठा आढळून आला. यावेळी सुनिल ज्ञानदेव मर्ढेकर (वय ४५, रा. ओझरे, ता. जावली, जि. सातारा), विठ्ठल रामचंद्र चव्हाण (वय ४७, रा. कामठी, पो. वेळे, जि. सातारा) आणि धनाजी संपत पवार (वय ५०, रा. वेळे, जि. सातारा) यांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. तपासात ३.१५ घनमीटर खैर लाकूड सापडले असून त...

महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; पाणीटंचाई, विकासकामे व योजनांच्या अंमलबजावणीवर भर

Image
महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; पाणीटंचाई, विकासकामे व योजनांच्या अंमलबजावणीवर भर प्रतापगड प्रतिनिधी :  पंचायत समिती महाबळेश्वरची मासिक सर्वसाधारण सभा आज कै. एम. आर. भिलारे सभागृहात सभापती सौ. शकुंतला रमेश चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेला उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्य संजय विठ्ठल शेलार, वंदना प्रवीण भिलारे, जिल्हा परिषद सदस्य संजय केळगणे, अजित संकपाळ, तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, गट विकास अधिकारी विजय विभुते यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. त्यानंतर विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या अहवालात अनुदान, खर्च व शिल्लक निधीची माहिती देण्यात आली. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांची गावनिहाय माहिती देण्यात आली असून टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बांधकाम विभागाच्या आढाव्यात जनसुविधा, यात्रास्थ...

महाबळेश्वरात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शिक्षक समितीतर्फे सत्कार सोहळा उत्साहात

Image
महाबळेश्वरात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शिक्षक समितीतर्फे सत्कार सोहळा उत्साहात महाबळेश्वर प्रतिनिधी :  महाबळेश्वर प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षक, पदाधिकारी व स्थानिक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष वसीम वारुणकर होते. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक व शिक्षक नेते दगडू ढेबे यांच्यासह विजय मोरे, नासिर वारुणकर, अंतोष सूर्यवंशी, इरफान शेख व संगीता उतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात सभापती शकुंतला चोरमले, उपसभापती संजय मोरे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकल्प, तसेच पंचायत समिती सदस्य संजय केळगणे, संजय उतेकर व वंदना भिलारे या नवनिर्वाचित प्रतिनिधींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी विजय विभुते हे देखील विशेष उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक समितीच्या उपक्रमांचे कौतुक करताना शिक्षण क्षेत्रातील सहकार्य आणि समन्...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!