कुंभरोशी येथे ‘जन्नी कुंभळजाई माता भजन मंडळ’ची स्थापना; वारकरी परंपरेला नवी उभारी
कुंभरोशी येथे ‘जन्नी कुंभळजाई माता भजन मंडळ’ची स्थापना; वारकरी परंपरेला नवी उभारी
कुंभरोशी प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी विभागातील वाडा येथे वारकरी संप्रदायाच्या भक्तीपरंपरेला चालना देणाऱ्या ‘जन्नी कुंभळजाई माता भजन मंडळा’ची नुकतीच स्थापना करण्यात आली. रामकृष्ण हरी वारकरी संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारला असून स्थानिक भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मंडळाच्या स्थापनेमागे सामाजिक एकात्मता, भजन-कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्मिक जागृती आणि वारकरी संस्कृतीचा प्रसार हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. संघाचे संस्थापक/अध्यक्ष ह.भ.प. श्री विश्वनाथ गरगडे, राज्य सचिव ह.भ.प. श्री प्रकाश ओबांसे तसेच सातारा जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेतून ही कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी श्री रमाकांत बाबूराव कात्रट, उपाध्यक्षपदी श्री अनिल लक्ष्मण मोरे तर सचिवपदी श्री गणेश बबन मोरे यांची निवड करण्यात आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गावात भक्तीभाव वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला.
या नव्या भजन मंडळाच्या स्थापनेमुळे कुंभरोशी परिसरात धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना नवे बळ मिळणार असून वारकरी परंपरेचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचणार असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment