हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल — महाबळेश्वर तालुक्यात अवकाळी पावसाने भात शेती उद्ध्वस्त
हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल — महाबळेश्वर तालुक्यात अवकाळी पावसाने भात शेती उद्ध्वस्त ✍️ जितेंद्र कारंडे, प्रतापगड प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा “हाता तोंडाशी आलेला घास” अक्षरशः मातीमोल केला आहे. वर्षभर मेहनत घेऊन उभे केलेले भातशेतीचे पीक अवकाळी पावसाने जमीनदोस्त झाले असून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तालुक्यातील अनेक भागात भाताच्या पिकासोबत गुरांचा चारा, धान्य साठे आणि भात कापणीची साधनेही ओलसर झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. 🌧️ पावसाचा तडाखा आणि पंचनाम्यांचा गोंधळ मागील दोन आठवड्यांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे महाबळेश्वर, माचुतर, झांजवड, मेटगुताड, पाचगणी परिसरातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती अद्याप मदतीचा ठोस निर्णय लागलेला नाही. “शासन पंचनामे करतंय, पण मदत कधी मिळणार?” असा प्रश्न शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 🧑🌾 “भिकेइतकी मदत” — शेतकऱ्यांचा संताप झांजवड येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत शंक...