महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते बाळासाहेब भिलारे दादा यांची ७७ वी जयंती उत्साहात साजरी



महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते बाळासाहेब भिलारे दादा यांची ७७ वी जयंती उत्साहात साजरी

सचिन भिलारे,

भिलार प्रतिनिधी: 

महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते, जननेते कैलासवासी बाळासाहेब भिलारे दादा यांची ७७ वी जयंती भिलार येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. दादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यांतील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

जयंतीनिमित्त भिलार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील स्त्री-पुरुषांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच दादांच्या कार्याचा गौरव करत अनेकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी भिलार येथील हिल रेंज माध्यमिक विद्यालय (मराठी माध्यम) या शाळेत नव्याने बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. शाळा विकासाबाबत दादांनी दाखविलेला मार्ग आजही प्रेरणादायी असल्याचे आबा पाटील यांनी सांगितले.

यानंतर श्रीराम विकास सोसायटी व दूध संघच्या वतीने बाळासाहेब भिलारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नितीन भिलारे, राजेंद्र भिलारे (आबा), गणपत पार्ठे, आनंदा विठू भिलारे, सरपंच शिवाजी भिलारे, प्रकाश भिलारे, पांडुरंग मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात भिलार भजनी मंडळाने सादर केलेल्या सुरेल भजन कार्यक्रमाने उपस्थितांचे मन मोहरले.


“दादा नसल्याची पोकळी आजही जाणवते” — मा. मकरंद आबा पाटील

दादांच्या आठवणींनी भारावून जात मा. मकरंद आबा पाटील म्हणाले,
“दादा असताना महाबळेश्वर तालुक्याकडे वेगळे लक्ष द्यावे लागत नव्हते. दादांचा एक शब्द माझ्यासाठी अंतिम असायचा. दादा आपल्यात नसल्यामुळे राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या निवडणुका दादा नसताना लढाव्या लागणार याचे दुःख आहे.”

हा भावनिक क्षण उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.


उपस्थित मान्यवर

राजेंद्र शेठ राजपुरे, संजूबाबा गायकवाड, बाबुराव सपकाळ, प्रवीण भिलारे, राजेंद्र भिलारे, गणपत पारटे, सुभाष कदम, सागर कदम, संजय देसाई, राजेंद्र पुजारी, हरीश गोळे, सागर भिलारे, सुरेंद्र भिलारे, नानासाहेब कासुर्डे, ग्रॅब्रिएल फ्रान्सिस यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.




राजकारण वेगळे — नेतृत्त्व एकच!
बाळासाहेब भिलारे दादांच्या तालमीत घडलेले अनेक कार्यकर्ते आज भिन्न राजकीय पक्षात कार्यरत असले, तरी दादांच्या जयंतीनिमित्त सर्वजण एका छताखाली एकत्र येऊन दादांप्रती आदर व निष्ठा व्यक्त करताना दिसले.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl