महाबळेश्वर–तापोळा मार्गावर चिखलीजवळ बसचा ब्रेक फेल; पाच प्रवासी किरकोळ जखमीस्थानिक नागरिकांनी धाव घेत केली मदत; जखमींवर तळदेव ग्रामीण रुग्णालयात उपचार
महाबळेश्वर–तापोळा मार्गावर चिखलीजवळ बसचा ब्रेक फेल; पाच प्रवासी किरकोळ जखमी स्थानिक नागरिकांनी धाव घेत केली मदत; जखमींवर तळदेव ग्रामीण रुग्णालयात उपचार तापोळा प्रतिनिधी : महाबळेश्वर–तापोळा मार्गावर चिखली गावाजवळ प्रवासी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत असताना ही घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून, या घटनेत पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरहून तापोळ्याच्या दिशेने जाणाऱ्या बसचा चिखली परिसरात अचानक ब्रेक फेल झाला. बसमधील प्रवाशांना परिस्थितीची जाणीव होताच काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने तळदेव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, दुखापती गंभीर नसल्याची माहिती मिळाली आहे. घटना घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव...