Posts

Featured post

महाबळेश्वर–तापोळा मार्गावर चिखलीजवळ बसचा ब्रेक फेल; पाच प्रवासी किरकोळ जखमीस्थानिक नागरिकांनी धाव घेत केली मदत; जखमींवर तळदेव ग्रामीण रुग्णालयात उपचार

Image
महाबळेश्वर–तापोळा मार्गावर चिखलीजवळ बसचा ब्रेक फेल; पाच प्रवासी किरकोळ जखमी स्थानिक नागरिकांनी धाव घेत केली मदत; जखमींवर तळदेव ग्रामीण रुग्णालयात उपचार तापोळा प्रतिनिधी :   महाबळेश्वर–तापोळा मार्गावर चिखली गावाजवळ प्रवासी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत असताना ही घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून, या घटनेत पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरहून तापोळ्याच्या दिशेने जाणाऱ्या बसचा चिखली परिसरात अचानक ब्रेक फेल झाला. बसमधील प्रवाशांना परिस्थितीची जाणीव होताच काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने तळदेव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, दुखापती गंभीर नसल्याची माहिती मिळाली आहे. घटना घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव...

स्वच्छ गाव–सुंदर गाव’चा संदेश घेऊन विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; सेलूतील रासेयोचा स्तुत्य उपक्रम

Image
‘स्वच्छ गाव–सुंदर गाव’चा संदेश घेऊन विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; सेलूतील रासेयोचा स्तुत्य उपक्रम हरिपाठाच्या मंगलमय गजराने अभियानाची सुरुवात; पावडे हदगाव, वाकी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ✍️उत्तम लोखंडे, परभणी/सेलू प्रतिनिधी :  “ स्वच्छ गाव–सुंदर गाव, स्वच्छ पर्यावरण–निरोगी जीवन! ” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नूतन महाविद्यालय, सेलूच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवानिमित्त आयोजित स्वच्छता व पर्यावरण सुरक्षा जनजागृती अभियानाचा पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पावडे हदगाव आणि वाकी या गावांना भेट देत ग्रामस्थांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक जबाबदारीबाबत जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या उपक्रमाला सामाजिक प्रबोधनाचे स्वरूप प्राप्त झाले. हरिपाठाच्या गजराने अभियानाची मंगलमय सुरुवात अभियानाची सुरुवात हरिपाठाच्या मंगलमय गजराने करण्यात आली. भक्तिमय ...

परभणी जिल्ह्यावर दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट; सर्व तालुके ‘ट्रिगर-१’मध्ये आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ पावसातील मोठा खंड, पिके वाळण्यास सुरुवात; खरीप पिके वाचविण्यासाठी जलसाठ्यांचा नियोजनबद्ध वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Image
परभणी जिल्ह्यावर दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट; सर्व तालुके ‘ट्रिगर-१’मध्ये आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ पावसातील मोठा खंड, पिके वाळण्यास सुरुवात; खरीप पिके वाचविण्यासाठी जलसाठ्यांचा नियोजनबद्ध वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ✍️उत्तम लोखंडे, परभणी प्रतिनिधी :  परभणी जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात झालेला अपुरा पाऊस, पावसातील मोठे खंड, प्रत्यक्ष पर्जन्यमान तसेच ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती आणि पिकांची सद्यस्थिती लक्षात घेता जिल्ह्यावर दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’मध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती शास्त्रीय पद्धतीने संकलित करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा , असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ४ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची सद्यस्थिती, उपलब्ध जलसाठे आणि सिंचन व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित...

नाक्यावर स्वतः उतरले पोलीस निरीक्षक; अडीच तासांची वाहतूक कोंडी काही मिनिटांत दूर ! महाबळेश्वर पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे यांच्या थेट हस्तक्षेपाचे नागरिक व पर्यटकांकडून कौतुक

Image
नाक्यावर स्वतः उतरले पोलीस निरीक्षक; अडीच तासांची वाहतूक कोंडी काही मिनिटांत दूर ! महाबळेश्वर पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे यांच्या थेट हस्तक्षेपाचे नागरिक व पर्यटकांकडून कौतुक महाबळेश्वर प्रतिनिधी : श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील नाक्यावर रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. वाहनांची संख्या वाढल्याने नाक्याच्या परिसरात वाहतूक मंदावली होती. तब्बल अडीच तासांपासून सुरू असलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे यांनी स्वतः घटनास्थळी उभे राहून वाहतूक नियंत्रणाची धुरा हाती घेतली. परिस्थितीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गालींदे यांनी केवळ पोलिसांना सूचना देण्यापुरते मर्यादित न राहता स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली. नाक्यावर अडकलेल्या वाहनांना योग्य दिशेने मार्ग करून देत त्यांनी वाहतुकीचे नियोजन केले. एका बाजूने येणाऱ्या वाहनांना थांबवून दुसऱ्या बाजूची वाहतूक पुढे सोडणे, अडकलेल्या वाहनांना मार्ग मोकळा करून देणे आणि वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने सुरू ठेवण्याचे काम त्यांनी प्...

प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला किमान एक शिपाई द्या!शिक्षकांना अध्यापनासाठी मोकळे करा; विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर मोर्चा

Image
प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला किमान एक शिपाई द्या! शिक्षकांना अध्यापनासाठी मोकळे करा; विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर मोर्चा सातारा प्रतिनिधी :   जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळावे, तसेच शिक्षकांना अध्यापनाच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला किमान एक शिपाई उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागणीसाठी पंचायत समिती कराडचे सदस्य संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हा परिषद परिसरात दाखल झालेल्या या मोर्चामध्ये ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत शाळांमधील शिपाई पदांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिपाई मिळालाच पाहिजे’, ‘शाळांचा दर्जा सुधारा’, ‘शिक्षकांना अध्यापनाचे काम करू द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांवर अध्यापनाबरोबरच शाळेच...

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; सातारा जिल्ह्यातील २९ शिक्षकांची गौरवासाठी निवड

Image
जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; सातारा जिल्ह्यातील २९ शिक्षकांची गौरवासाठी निवड सातारा प्रतिनिधी :   सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सन २०२६-२७ साठी देण्यात येणाऱ्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्राप्त प्रस्तावांचे मूल्यमापन करून विविध निकषांच्या आधारे पात्र ठरलेल्या २९ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि शाळेच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल या निवडीच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांच्या कार्याचे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे. सन २०२६-२७ च्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांमध्ये लोणंद मुली शाळेच्या मृणाल जाधव, सुरवडीच्या माधुरी सोनवलकर, दहिवडी नंबर १ शाळेचे सागर जाधव, के...

‘नमो उद्याना’च्या लोकार्पणातून सेलूच्या विकासाचे नवे पर्व; शहराचा कायापालट करण्याची पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्वाही

Image
‘नमो उद्याना’च्या लोकार्पणातून सेलूच्या विकासाचे नवे पर्व; शहराचा कायापालट करण्याची पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्वाही क्रीडा सुविधांसाठी २५ कोटींचा ‘खेलो इंडिया’ प्रस्ताव; महिला-बालकांसाठी ५० खाटांचे रुग्णालय, आयटीआय इमारत, वाढीव पाणीपुरवठा व भूमिगत ड्रेनेजसह विविध विकासकामांना गती ✍️उत्तम लोखंडे परभणी/सेलू प्रतिनिधी : सेलू शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देऊन नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. ‘नमो उद्याना’च्या लोकार्पणातून सेलूच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, आगामी काळात सेलू शहराचा कायापालट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत , अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. सेलू नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘नमो उद्याना’चे लोकार्पण पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, मुख्...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!