सोनाईतील संजय वैराग घटनेप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी वाई तहसीलदारांना म. प्र. झोपडपट्टी सुरक्षा दलामार्फत निवेदन
सोनाईतील संजय वैराग घटनेप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
वाई तहसीलदारांना म. प्र. झोपडपट्टी सुरक्षा दलामार्फत निवेदन
महाबळेश्वर प्रतिनिधी :
अहिल्यानगर येथील सोनाई परिसरात मातंग समाजातील युवक श्री. संजय वैराग याच्यावर अमानुष आणि प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी, तसेच गुन्हा मकोका आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने वाई तहसील कार्यालयासमोर आज निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत (सनी) ननावरे म्हणाले की,
“संजय वैराग या युवकावर झालेला प्राणघातक हल्ला अत्यंत निंदनीय आणि समाजमनाला चीड आणणारा आहे. आरोपी सर्रास फिरत आहेत, ज्यामुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन तीन-चार जिल्ह्यातून तडीपार करावे.”
तसेच प्रकरणात संबंधित परिसरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी आरोपींना मोकळीक दिली आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला.
“विजय माळी यांच्यावर ठपका ठेवून त्यांना सहआरोपी करण्यात यावे आणि सदर पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्याची कारवाई करावी,” अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी जलद गतीने करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी संघटनेने केली.
“जर शासन व पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर संघर्षनायक लोकनेते भगवानराव वैराट साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देत आहोत,” असा इशाराही ननावरे यांनी दिला.
निवेदन सादर करताना उपस्थित मान्यवर
- श्री. प्रवीण संकपाळ (वाई तालुकाध्यक्ष)
- श्री. ऋषिकेश जाधव (प्रवक्ते)
- श्री. दिलीप कांबळे (जिल्हा कार्याध्यक्ष)
- श्री. संतोष फरतडे (जिल्हा उपाध्यक्ष)
- श्री. संतोष बाबर
- श्री. संजय सकटे (जिल्हा सरचिटणीस)
- श्री. सुनील भिसे
- श्री. राजेंद्र सोनवणे
- श्री. करण साठे
- श्री. विजय भिसे
- सौ. वृषाली कांबळे
- श्री. सिद्धाराम ढोबळे
इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment