मांघर बनेल ‘मधाचे गाव’; आरती ड्रग्स व शिल्लनेट सोल्युशन्स यांच्या सामाजिक उपक्रमातून सातेरी मधपेट्यांचे वितरण व नामफलक अनावरण सोहळा
✍️ विलास काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर, दि. ३ नोव्हेंबर – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबईच्या मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्या पुढाकाराने, तसेच आरती ड्रग्स लिमिटेड (तारापूर) व शिल्लनेट सोल्युशन्स इंडिया प्रा. लि., मुंबई यांच्या व्यावसायिक सामाजिक दायित्व (CSR) निधीतून “मधाचे गाव मांघर” या उपक्रमांतर्गत सातेरी मधपेट्यांचे वितरण आणि नामफलक अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता मांघर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. रवींद्र साठे, सभापती (राज्यमंत्री दर्जा), महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई हे उपस्थित राहणार आहेत.
🟢 प्रमुख उपस्थिती:
- मा. श्रीमती गीतांजली बाविस्कर (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ
- मा. श्री रविंद्र ठाकरे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी
- मा. डॉ. विवेक दामले, सह मुख्य कार्यकारी अधिकारी
- मा. श्री प्रकाश पाटील, अध्यक्ष, आरती ड्रग्स लिमिटेड
- अध्यक्ष, शिल्लनेट सोल्युशन्स इंडिया प्रा. लि.
- श्री. नित्यानंद पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (उद्योग)
- श्री. रघुनाथ नायणकर, प्रादेशिक संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर
- श्री. गणेश बबन जाधव, सरपंच, मांघर ग्रामपंचायत
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांघर हे गाव ‘मध उत्पादनाचे आदर्श केंद्र’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. स्थानिक युवक व शेतकऱ्यांना मध उत्पादनाचे प्रशिक्षण, उपकरणे आणि मधपेट्यांचे वितरण करून त्यांना स्वावलंबी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
“मधाचे गाव” या प्रकल्पांतर्गत प्रत्येक लाभार्थीला सातेरी जातीच्या दर्जेदार मधपेट्या देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक शेती, परागसिंचन वाढ व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मध संचालनालयाचे प्रादेशिक संचालक श्री. रघुनाथ नायणकर यांनी विशेष परिश्रम घेतले असून, अधिक माहितीसाठी त्यांच्याशी ९४२२१०२१४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा उपक्रम खादी ग्रामोद्योग मंडळाच्या ग्रामीण विकास धोरणाचा भाग असून, उद्योग, पर्यावरण आणि शाश्वत उपजीविका यांचा सुंदर संगम घडविणारा ठरणार आहे.
Comments
Post a Comment