सोनाट येथे रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यूकुटुंबीयांना मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची सांत्वन भेट



सोनाट येथे रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

कुटुंबीयांना मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची सांत्वन भेट

जितेंद्र कारंडे,

 प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट येथे रानगव्याच्या हल्ल्यात दुर्दैवाने मृत्यू झालेल्या शेतकरी स्व. राघू जानू कदम यांच्या कुटुंबीयांना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी भेट देऊन सांत्वन व्यक्त केले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे जीवितहानी होणे ही अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायी बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी राघू कदम यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर ओढावलेली दुःखाची छाया मोठी आहे. राज्य सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी नेहमीच उभे असून, या प्रकरणात शासनाकडून शक्य ती सर्व मदत वेगाने मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.


मदत जलदगतीने मिळावी – स्थानिकांचे आवाहन

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना राबविण्याची मागणी स्थानिकांनी केली.


मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य धोंडीराम जंगम, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, माजी सभापती संजूबाबा गायकवाड, जिल्हा नियोजन मंडळ संचालक प्रवीण भिलारे, सागर शेठ कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबुराव सपकाळ यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl