महाबळेश्वर सांडपाणी प्रकरणात संतापाचा स्फोट : सामाजिक कार्यकर्ते सचिन मोहिते आक्रमक — “हॉटेल–अधिकारी अभद्र युती”वर गंभीर आरोप!

🚨 महाबळेश्वर सांडपाणी प्रकरणात संतापाचा स्फोट : सामाजिक कार्यकर्ते सचिन मोहिते आक्रमक — “हॉटेल–अधिकारी अभद्र युती”वर गंभीर आरोप!

✍️ जितेंद्र कारंडे,

 प्रतापगड प्रतिनिधी –

महाबळेश्वर दि. १ :
पर्यटनाचे मुख्य केंद्र, निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त असलेले महाबळेश्वर शहर पुन्हा एकदा सांडपाणीप्रकरणी चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन मोहिते यांनी काही नामांकित हॉटेल्सकडून निसर्गात थेट  मैला युक्त सांडपाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघड करत संतप्त आंदोलन केले आहे.


💧 सांडपाण्यामुळे निसर्गाचा विध्वंस!

मोहिते यांनी केलेल्या या आंदोलनाचा व्हिडिओ ‘News Katta Express’ या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झाला असून, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे दाखवले आहे की काही नामांकित हॉटेल्स त्यांच्या हॉटेलमधून निघणारे महिलायुक्त सांडपाणी कोणत्याही शुद्धीकरणाशिवाय थेट निसर्गात सोडत आहेत.
त्यामुळे परिसरात इतकी दुर्गंधी व प्रदूषण निर्माण झाले आहे की रस्त्यावर काही क्षण उभे राहणेही अशक्य झाले आहे. “हे केवळ निसर्गावर अन्याय नाही, तर भावी पिढ्यांवर अन्याय आहे,” असे मोहिते यांनी आंदोलनादरम्यान सांगितले.


🤝 “हॉटेल–अधिकारी अभद्र युती”चा आरोप

या सगळ्या प्रकारामागे स्थानिक अधिकारी व हॉटेल व्यावसायिक यांची संगनमताने चालणारी युती असल्याचा गंभीर आरोपही मोहिते यांनी केला आहे. “ही आर्थिक देवाणघेवाणीवर आधारित अभद्र युती आहे,” असा त्यांचा थेट शब्दांत आरोप असून, अशा भ्रष्टाचारामुळेच पर्यावरणाचा विध्वंस होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.


⚖️ नियमांची उघडपणे पायमल्ली

महाबळेश्वर परिसर Eco-Sensitive Zone आणि World Heritage Site या दोन्ही श्रेणींमध्ये मोडतो. अशा ठिकाणी पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असतानाही, काही हॉटेल्सकडून हायकोर्टाचे निर्देश, म्युनिसिपल नियम, वनविभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश उघडपणे पायदळी तुडवले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
“ही परिस्थिती पाहता असं वाटतं की नियम केवळ सामान्य नागरिकांसाठी आहेत, सत्ताधारी आणि उद्योगपतींसाठी नव्हेत,” अशी टीका मोहिते यांनी केली.


🚨 “तात्काळ कारवाई करा — नाहीतर तीव्र आंदोलन!”

या प्रकारावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करताना मोहिते यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर संबंधित हॉटेलवर आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारू.”
त्यांनी सांगितले की, या आंदोलनात उघड केलेले हे केवळ एकच हॉटेल असून, त्यांच्या कडे अशाच सात हॉटेल्सविरुद्ध ठोस पुरावे आहेत.
“हे आंदोलन केवळ एका हॉटेलविरुद्ध नाही, तर संपूर्ण भ्रष्ट सिस्टीमविरुद्ध आहे,” असे ते म्हणाले.


🌱 पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप

महाबळेश्वरमध्ये घडत असलेले हे प्रकार ऐकून स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि पर्यटक वर्तुळामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पर्यटनाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होत असताना शासन, वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने त्वरित व ठोस पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.

 आम्ही प्रशासनाकडे ठाम मागणी करतो —
महाबळेश्वरच्या निसर्गाचा विनाश थांबवा! सांडपाण्याच्या प्रदूषणाविरोधात जबाबदार हॉटेल व अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करा.
निसर्गाचे रक्षण हीच खरी विकासाची पायरी आहे. 🌿



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl