विनापरवाना खैर लाकूड वाहतूक प्रकरणी कारवाई; तीन आरोपी रंगेहात पकडले, वाहनासह माल जप्त

विनापरवाना खैर लाकूड वाहतूक प्रकरणी कारवाई; तीन आरोपी रंगेहात पकडले, वाहनासह माल जप्त

प्रतापगड प्रतिनिधी :

महाड–पोलादपूर मार्गावरील चेकनाक्यावर वनविभागाने धाडसी कारवाई करत विनापरवाना खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या तिघांना रंगेहात पकडले असून मोठ्या प्रमाणात लाकूड व वाहन जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे अवैध लाकूड तस्करीविरोधात वनविभागाने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी वनरक्षक महाड–पोलादपूर चेक नाका येथे कार्यरत असलेल्या श्रीमती शालिनी कोहळे यांनी MH-01-LA-8878 क्रमांकाच्या पिकअप वाहनाला थांबण्याचा इशारा दिला असता संबंधित वाहन न थांबता वेगाने पुढे निघून गेले. संशय अधिक बळावल्याने त्यांनी तत्काळ पाठलाग करून वाहन अडवले. तपासणीदरम्यान वाहनामध्ये खैर लाकडाचा साठा आढळून आला.

यावेळी सुनिल ज्ञानदेव मर्ढेकर (वय ४५, रा. ओझरे, ता. जावली, जि. सातारा), विठ्ठल रामचंद्र चव्हाण (वय ४७, रा. कामठी, पो. वेळे, जि. सातारा) आणि धनाजी संपत पवार (वय ५०, रा. वेळे, जि. सातारा) यांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. तपासात ३.१५ घनमीटर खैर लाकूड सापडले असून त्याची अंदाजे किंमत ६१ हजार ४२५ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी वनरक्षक शालिनी कोहळे यांनी प्रकरण गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१/२०२६ अंतर्गत नोंद केला असून संबंधित अशोका लेलँड पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे करत आहेत.

दरम्यान, वनविभागाने नागरिकांना आवाहन करताना स्पष्ट केले आहे की, वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश, अतिक्रमण, अवैध लाकूडतोड व वाहतूक, प्लास्टिक कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे किंवा शिकार करणे असे प्रकार गंभीर गुन्हे मानले जातील आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl