लोन मिळवून देण्याचे आमिष; गुंगीकारक पदार्थ देत महिलेचे दीड लाखांचे दागिने व मोबाईल लंपास

लोन मिळवून देण्याचे आमिष; गुंगीकारक पदार्थ देत महिलेचे दीड लाखांचे दागिने व मोबाईल लंपास

महाबळेश्वर प्रतिनिधी :
सातारा ते महाबळेश्वर दरम्यान एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुंगीकारक पदार्थ देऊन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

याबाबत महाबळेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता सूर्यकांत देवरुखकर (वय 32, रा. नरवन, ता. महाड, जि. रायगड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान त्या सातारा ते महाबळेश्वर या मार्गावर एसटी बसने प्रवास करत होत्या. यावेळी बसमध्ये संदीप नावाच्या अंदाजे 45 वर्षीय व्यक्तीने त्यांच्याशी ओळख वाढवत लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

आरोपीने विश्वास संपादन करून फिर्यादी महिलेला पिण्याच्या पाण्यातून काही गुंगीकारक पदार्थ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर फिर्यादी यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच व्हीओ कंपनीचा निळसर रंगाचा मोबाईल असा एकूण 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपी पसार झाला.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 318(2) व 318(4) प्रमाणे महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 36/2026 दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद 28 एप्रिल रोजी रात्री 11.27 वाजता करण्यात आली असून आरोपी अद्याप फरार आहे.

घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परजणे करीत असून पोलीस निरीक्षक बी. पी. सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl