हातलोट येथे ‘श्री गावनाथ कुंभळजा प्रासादिक भजन मंडळा’ची स्थापना; वारकरी परंपरेला नवी ऊर्जा
हातलोट येथे ‘श्री गावनाथ कुंभळजा प्रासादिक भजन मंडळा’ची स्थापना; वारकरी परंपरेला नवी ऊर्जा
महाबळेश्वर प्रतिनिधी :
वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक परंपरेला बळकटी देत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या मार्गदर्शनाखाली हातलोट येथे ‘श्री गावनाथ कुंभळजा प्रासादिक भजन मंडळा’ची स्थापना करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील वारकरी चळवळीला नवे बळ मिळणार असून भजन-कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाजजागृतीचा प्रसार होणार आहे.
संघाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. श्री विश्वनाथ गरगडे, महाराष्ट्र राज्य सचिव ह.भ.प. श्री प्रकाश ओबासे, जिल्हाध्यक्ष सातारा श्री अरुणराव कटुटे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. श्री शंकर कृष्णा गोळे (बापूराव), जिल्हा सचिव ह.भ.प. श्री दिलीप यादव, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष ह.भ.प. श्री अशोकराव पोळ, जिल्हा संघटक ह.भ.प. श्री गुलाबराव आमराळे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष ह.भ.प. श्री जगन्नाथ आमराळे तसेच तालुका उपाध्यक्ष ह.भ.प. श्री सखाराम ढेबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्थापना जाहीर करण्यात आली.
नवीन भजन मंडळाच्या अध्यक्षपदी श्री मधुकर नारायण मोरे, उपाध्यक्षपदी श्री संभाजी शिवाजी मोरे आणि सचिवपदी श्री शशिकांत देऊराव मोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वारकरी संप्रदायातील भजन-कीर्तन परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
हातलोट व परिसरातील भाविकांमध्ये या स्थापनेमुळे उत्साहाचे वातावरण असून, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment