रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या प्रेरणेने बिरमणी येथे भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळाची स्थापना; वारकरी परंपरेला नवे बळ
रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या प्रेरणेने बिरमणी येथे भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळाची स्थापना; वारकरी परंपरेला नवे बळ
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील बिरमणी येथे वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासण्यासाठी आणि धार्मिक-सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने रामकृष्ण हरी वारकरी संघाच्या माध्यमातून भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसरात भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून अध्यात्मिक वातावरण अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रामकृष्ण हरी वारकरी संघ, महाराष्ट्र राज्य (नोंदणी क्र. महा-पुणे-इ ७१२४) या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या मंडळामध्ये राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष ह.भ.प. श्री. विश्वनाथ गरगडे, महाराष्ट्र राज्य सचिव ह.भ.प. श्री. प्रकाश ओबांसे, सातारा जिल्हाध्यक्ष श्री. अरुणराव कट्टे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. श्री. शंकर कृष्णा गोळे (बापूराव), जिल्हा सचिव ह.भ.प. श्री. दिलीप यादव, कार्यकारी अध्यक्ष ह.भ.प. श्री. अशोकराव पोळ, जिल्हा संघटक ह.भ.प. श्री. गुलाबराव आमराळे तसेच महाबळेश्वर तालुका अध्यक्ष ह.भ.प. श्री. जगन्नाथ आमराळेमहाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष सखाराम ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची उभारणी करण्यात आली आहे.
भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ बिरमणीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये श्री. किसन नारायण घाडगे (अध्यक्ष), श्री. पंढरीनाथ पांडू मोरे (उपाध्यक्ष) आणि श्री. रघुनाथ शंकर मोरे (सचिव) यांचा समावेश असून मंडळाच्या माध्यमातून नियमित भजन, कीर्तन, हरिपाठ, तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या स्थापनेमुळे गावातील युवकांना सकारात्मक दिशा मिळण्यास मदत होणार असून वारकरी संप्रदायातील मूल्ये आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवले जाणार आहे. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment