महाबळेश्वर नगराध्यक्षपदाची पंचरंगी लढत तापली; तिन्ही प्रमुख आघाड्यांच्या अस्तित्वाची प्रतिष्ठेची निवडणूक


महाबळेश्वर नगराध्यक्षपदाची पंचरंगी लढत तापली; तिन्ही प्रमुख आघाड्यांच्या अस्तित्वाची प्रतिष्ठेची निवडणूक

✍️ सचिन शिर्के
महाबळेश्वर प्रतिनिधी

महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. थंड हवेच्या ठिकाणी आता राजकीय गरमागरमीचे वारे वाहू लागले आहेत. विशेषत नगराध्यक्षपदाचा सामना अत्यंत रोमांचक आणि अटीतटीचा होणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत:
  सुनील शिंदे हे आमदार गटकडून , डी. एम. बावळेकर लोक मित्र जनसेवा आघाडी कडून , कुमार शिंदे शिंदे गटाकडून अपक्ष 
  संजय पाटील अपक्ष, तर सतीश साळुंखे अपक्ष 
या प्रमुख आणि अपक्ष उमेदवारांमुळे नगराध्यक्षपदाची लढत पंचरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या निवडणुकीत राज्यातील काही मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात सत्तेमध्ये एकत्र असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई
  या मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील, या दोघांनाही आव्हान देणारी लोक मित्र जनसेवा आघाडीचे नेते आणि उमेदवार डी. एम. बावळेकर या सर्व दिग्गजांच्या सक्रिय सहभागामुळे निवडणुकीला आणण्या महत्त्व प्राप्त झाले आहे.
  नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी तब्बल ६३उमेदवार मैदानात उतरले आहेत.
या प्रचंड संख्येमुळे सर्व प्रभागांतील वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच प्रमुख उमेदवारांनी व पक्षांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले असून आपल्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पूर्ण क्षमतेने व ताकदीने मैदानात उतरवले आहे. त्यामुळे महाबळेश्वरची आगामी निवडणूक रंगतदार आणि निर्णायक ठरणार आहे.
महाबळेश्वर नगरपालिका आर्थिकदृष्ट्या 'ब ' वर्गातील सर्वात श्रीमंत नगरपालिका असूनही, अपेक्षित असलेला पर्यटन क्षेत्राचा विकास साधण्यात अपयशी ठरली आहे. लोकसंख्येच्या मानाने छोटी असलेली ही नगरपालिका पूर्णतः पर्यटन आणि पर्यटकांवर अवलंबून आहे. 
 महाबळेश्वर शहर हे पर्यटनावर अवलंबून असतानाही, ज्या पद्धतीने विकास होणे अपेक्षित होते, तसा तो आजतागायत झालेला नाही. शहरात आजही मोठ्या प्रमाणात ब्रिटिशकालीन संरचनाच पाहायला मिळत आहे. यात थोडाफार बदल झाला असला तरी, स्थानिक लोकप्रतिनिधींना अपेक्षित विकास करता आला नाही. नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही, विकासाची गती धीमी राहण्यामागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि अंतर्गत सहकार्याची कमतरता हे मुख्य कारण ठरले आहे. काही लोकप्रतिनिधींनी पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी उपाययोजना अमलात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. यामुळे त्यांची काम करण्याची उमेद कमी झाली आणि अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना मूर्त रूप देता आले नाही.
महाबळेश्वरमधील नागरिकांसाठी महाबळेश्वर करांसाठी हे दुर्दैवी ठरले आहे की, अमर्याद नैसर्गिक क्षमता आणि मजबूत आर्थिक पाठबळ असूनही, शहराचा विकास राजकीय गटबाजीच्या गर्तेत अडकला आहे.
  महाबळेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा पाच उमेदवार रिंगणात असले तरी, खरी लढत तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, या लढतीत कोणत्याही अपक्ष उमेदवाराला कमी लेखून चालणार नाही, अशीही चर्चा सुरु आहे.
या निवडणुकीतील प्रमुख तिन्ही आघाड्यांच्या उमेदवारांचा राजकीय प्रवास पाहिल्यास, त्यांना नगरपालिकेचा आणि राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. या ज्ञानामुळे, महाबळेश्वरचा 'राजदंड' एका अभ्यासू आणि सुसंस्कृत व्यक्तीच्या हाती देण्याचा निर्णय मतदार घेतील, अशी अपेक्षा आहे.
त्यामुळेच, या नगराध्यक्षपदाच्या रणसंग्रामामध्ये हे तिन्ही प्रमुख उमेदवार महाबळेश्वरच्या मतदारांची मने जिंकण्यासाठी आपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
  आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, लोक मित्र जनसेवा आघाडीकडून उमेदवारी मिळालेले माजी नगराध्यक्ष डी.एम. बावलेकर यांचा राजकीय प्रवास महाबळेश्वरच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जातो नरपालिकेचे सदस्य म्हणून सुमारे २३ वर्षांचा दांडगा अनुभव असलेले बावलेकर हे शहराच्या विकासासाठी सतत कार्यरत राहिले आहेत.
बावलेकर यांनी सुरुवातीला काही काळ महाबळेश्वर नगरपालिकेत प्रशासकीय कर्मचारी म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन १९९१ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि ते नगरसेवक म्हणून निवडून आले.
राजकारणात प्रवेश केल्यापासून मधला काही वर्षांचा अपवाद वगळता, बावलेकर यांचा आजपर्यंतचा एकूण राजकीय अनुभव सुमारे २३ वर्षांचा आहे. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी दहा ते बारा वर्षे नगराध्यक्ष म्हणून पदभार सांभाळले इतर उर्वरित वर्षांमध्ये नगरसेवक म्हणून पालिकेचे सदस्यत्व भूषवले.
बावलेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात नगरपालिकेच्या विकासासाठी शासन दरबारातून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळवले. शहराच्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी तसेच सार्वजनिक कामांसाठी त्यांनी निधी खेचून आणण्यात यश मिळवले.
त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या प्रमुख कामांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:आठवडे बाजार निर्माण .तसेच शहरातील सांस्कृतिक भवन उभारणी. शहरातील सर्व समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून, काही ठराविक चौकांना समाजाच्या थोर नेत्यांची नावे देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
   याव्यतिरिक्त, शहरात अनेक छोटे-मोठे विकास प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत.
  या निवडणुकीत माजी नगरसेवक कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुसरी आघाडी उभी आहे.ते या तालुक्याचे सुपुत्र, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे विश्वासू आहेत, तसेच माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांचे पती आहेत. त्यांनी एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहेत.तसेच 
कुमार शिंदे यांचा राजकीय प्रवास लक्षणीय आहे: २००६ मध्ये त्यांच्या मातोश्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात येथून झाली.
  २०११ व २०१६: या दोन्ही निवडणुकांमध्ये ते स्वतः विजयी झाले. २०१६ मध्ये त्यांनी निर्णायक भूमिका घेऊन आमदार मकरंद पाटील यांच्या आदेशाने त्यांनी निवडणुकीची संपूर्ण सूत्रे हाती घेतली. त्यांच्या विश्वासार्हतेमुळे त्यांनी पूर्ण बहुमताने ठराविक उमेदवार व नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी करून दाखवला. आपल्या कारकिर्दीत कुमार शिंदे यांनी महाबळेश्वरचे काही जटील प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, 
    वनविभागाच्या हद्दीत असलेल्या महाबळेश्वर स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न मार्गी लावला. मनोहर हाऊसिंग सोसायटी व जिजामाता सोसायटी या दोन सोसायटींना वनविभागाच्या हद्दीतून जाणारा रस्ता मंजूर करून घेतला. शहराला भेडसावणारी पार्किंगची समस्या लक्षात घेऊन, त्यांनी सहकाऱ्यांच्या व तत्कालीन नगराध्यक्षा उज्वला तोष्णीवाला यांच्या सहकार्याने दोन मजली पार्किंगची इमारत उभी केली.
 त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा असताना, महाबळेश्वर नगरपालिकेला स्वच्छ भारत अभियानामध्ये पारितोषिक मिळवून दिले.
 तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शहर सुशोभीकरणासाठी १०० कोटींचा भरघोस निधी उपलब्ध करून घेतला. ठराविक पॉईंट्सकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी ३५ कोटींचा निधी देखील मंजूर करून घेतला. शहराच्या स्वच्छतेबाबत त्यांनी ठोस पावले उचलून पर्यटक आणि शहरवासीयांना स्वच्छतेची शिस्त लावली. बाजारपेठ, वेण्णा लेक आणि पॉईंट्स रोजच्या रोज स्वच्छ ठेवले जात होते आणि डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर काही प्रमाणात प्रक्रियाही सुरू केली होती.
कुमार शिंदे यांनी केलेल्या भरीव विकासकामांवर शहरवासीयांचा विश्वास असला तरी, त्यांच्याकडून शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत व डेव्हलपमेंटबाबत खूप मोठ्या अपेक्षा होत्या. या अपेक्षा पूर्ण करण्यात ते काही प्रमाणात कमी पडले, अशी नागरिकांची भावना होती 
आगामी महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी आमदार गटाने तिसरी आघाडी उघडली असून, नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक सुनील शिंदे हे प्रमुख उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. शिंदे यांची राजकीय कारकीर्द पाहता, त्यांनी थेट नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळवून मोठी राजकीय मुसंडी मारल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक तिन्ही प्रमुख उमेदवारांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. सुनील शिंदे यांचा राजकारणातील प्रवेश उल्लेखनीय आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते महाबळेश्वर नगरपरिषदेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. शासकीय सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश केला.
   २०१६ मध्ये त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली होती.
  मात्र, तेव्हा त्यांच्या चुलत्यांनी त्यांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावली आणि नंतर 'मागील दाराने' त्यांची नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावली. येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली.
  स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांचा एक मोठा चाहता वर्ग शहरात तयार झाला आहे.
शहरातील या वाढलेल्या जनसमर्थनाच्या बळावर, शिंदे यांनी यंदा नगरसेवकपदाऐवजी थेट नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळवण्यासाठी पक्षाकडे जोरदार आग्रह धरला. पक्षाच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकून, मोठा संघर्ष करत त्यांनी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचे तिकीट आपल्या पदरात पाडून घेतले आहे.
सुनील शिंदे यांच्या उमेदवारीमुळे शहरवासीयांच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
"शिंदे यांनी नगराध्यक्ष झाल्यावर पर्यटन क्षेत्रात महाबळेश्वरचा नावलौकिक वाढवावा आणि महाबळेश्वरला आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख मिळवून द्यावी," अशी प्रमुख मागणी शहरवासियांकडून केली जात आहे.
हा संघर्षपूर्ण प्रवेश आणि शहरवासीयांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे, यावर्षीची नगरपालिकेची निवडणूक ही तिन्ही उमेदवारांच्या राजकीय अस्तित्वाची अत्यंत चुरशीची लढाई ठरणार आहे, यात शंका नाही.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl