महाबळेश्वरात संविधान दिन उत्साहात साजराभारतीय बौद्ध महासभा, भीमक्रांती युवक संघटना व वंचित बहुजन आघाडीचा संयुक्त पुढाकार
महाबळेश्वरात संविधान दिन उत्साहात साजरा
भारतीय बौद्ध महासभा, भीमक्रांती युवक संघटना व वंचित बहुजन आघाडीचा संयुक्त पुढाकार
महाबळेश्वर प्रतिनिधी –
भारतीय संविधान दिनानिमित्त महाबळेश्वर येथे विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने औचित्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर, भीमक्रांती युवक संघटना महाबळेश्वर आणि वंचित बहुजन आघाडी महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवरांनी संविधान मूल्यांची जाण, सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या तत्वांची समाजात रुजवणूक करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा महिला अध्यक्ष मा. नंदा यादव, हिशोब तपासनीस सिद्धार्थ यादव, भीमक्रांती युवक संघटना महाबळेश्वर अध्यक्ष संतोष भालेराव, वंचित बहुजन आघाडी महाबळेश्वर अध्यक्ष उत्तम भालेराव, संतोष जाधव, बबन जाधव, बबन सपकाळ, समता सैनिक हरिभाऊ भालेराव, संजय कदम, लक्ष्मण कदम तसेच विविध समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमात भारतीय संविधानाची प्रस्तावना एकजुटीने वाचण्यात आली. संविधान निर्मितीतील बाबासाहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, सामाजिक न्यायाचा मार्ग आणि लोकशाहीचे बळकटीकरण यावर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तरुण पिढीने संविधानातील मूलभूत कर्तव्यांची जाणीव ठेवून समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही संदेश यावेळी देण्यात आले.
संविधान दिनानिमित्त घेतलेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले. महाबळेश्वर परिसरातील सर्व घटकांना एकत्र आणत सामाजिक सौहार्द, समता आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
Comments
Post a Comment