महाबळेश्वरमध्ये मोफत हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षणाला सुरुवात; ३३ प्रवेश पूर्ण, उर्वरित जागांसाठी उत्सुकता



महाबळेश्वरमध्ये मोफत हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षणाला सुरुवात; ३३ प्रवेश पूर्ण, उर्वरित जागांसाठी उत्सुकता

✍️मिलिंद काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गरवारे टेक्निकल फायबर्स, गरवारे युवा प्रशिक्षण केंद्र आणि सेवा सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ‘फ्रंट डेस्क ऑपरेटर आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट’ कोर्सला २७ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष प्रवेश सुरू झाले. हॉटेल अशोका इन येथे बॅचचे उद्घाटन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रवेश नोंदवला असून आतापर्यंत ३३ प्रवेश पूर्ण झाले आहेत.

दोन महिन्यांचा हा मोफत प्रशिक्षण कोर्स १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध असून मॅनेजमेंट, कम्युनिकेशन, अॅडमिनिस्ट्रेशन, कस्टमर रिलेशनशिप, ऑफिस ऑपरेशन्स, कोऑर्डिनेशन, प्रोफेशनलिझम आणि कम्प्लेन्ट रिजोल्यूशन यांसारखी आवश्यक कौशल्ये या माध्यमातून शिकवली जाणार आहेत. फ्रंट डेस्क क्षेत्रातील नोकरीसाठी आवश्यक मूलभूत ते प्रगत कौशल्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे दिली जाणार असल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये या कोर्सला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोर्ससाठी फक्त ५० जागा उपलब्ध असून उर्वरित काही जागांसाठी इच्छुकांनी तातडीने संपर्क साधावा असे आयोजकांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी ९८८१४२४८३०, ८९५६०७१९३९ आणि ८६२५९८४६१६ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl