महाबळेश्वर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी–
महाबळेश्वर येथे समाजसुधारक व सत्यशोधक चळवळीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यापुढे शांततेत अभिवादन करून झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवर—श्रीकांत जाधव सचिन धोत्रे संतोष यादव नितीन परदेशी दिलीप शिपटे, शिरीष गांधी किरण जाधव पत्रकार संदीप देवकुळे
यांनी फुले यांच्या सामाजिक परिवर्तनातील योगदानाची आठवण करून दिली.
यावेळी वक्त्यांनी शिक्षण प्रसार, स्त्री-शूद्र-अतिशूद्र उत्थान, शेती सुधारणा आणि समतावादी विचारांना महात्मा फुले यांनी दिलेल्या गतीचा आढावा घेत, त्यांच्या कार्याची आजही समाजाला प्रेरणा देणारी गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमात उपस्थितांनी फुले दांपत्यांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम शांत, अनुशासित आणि श्रध्दाभावाने पार पडला.
Comments
Post a Comment