महाबळेश्वर विकासकामांमध्ये 'महा'भ्रष्टाचार! कोट्यवधींच्या निधीतून झालेल्या कामांची चौकशी करा: सामाजिक कार्यकर्ते पांचाळ यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

 महाबळेश्वर विकासकामांमध्ये 'महा'भ्रष्टाचार! कोट्यवधींच्या निधीतून झालेल्या कामांची चौकशी करा: सामाजिक कार्यकर्ते पांचाळ यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी 

महाबळेश्वर (प्रतिनिधी):

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि. २५/११/२०२५) महाबळेश्वर येथे भेट दिली असता, शहरातील सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते श्री. सूर्यकांत (बाळासाहेब) पांचाळ यांनी त्यांची समक्ष भेट घेऊन महाबळेश्वर नगरपालिकेच्या अखत्यारीतील कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांमधील कथित भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाबद्दल लेखी तक्रार निवेदन सादर केले.

नगरपालिकेला पर्यटन विकास कामांसाठी मिळालेले १०० कोटी रुपये, सिमेंट-काँक्रिट रस्त्यांसाठी मिळालेले ३६ कोटी रुपये, तसेच वेळोवेळी मंजूर झालेल्या इतर कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या विनियोगामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप श्री. पांचाळ यांनी केला आहे. विकास कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, शहरात कामांचा बोजवारा उडाला असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

*📝 पांचाळ यांच्या तक्रारीतील प्रमुख मुद्दे:*
▪️गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महाबळेश्वर नगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या तक्रारी शासनाकडे प्रलंबित आहेत.

▪️पर्यटन विकासासाठी दिलेला १०० कोटी रुपयांचा निधी, ३६ कोटी रुपयांचे सिमेंट-काँक्रिट रस्ते आणि इतर विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे.

▪️प्रत्यक्षात झालेली विकास कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून, निधीचा योग्य वापर झालेला नाही.

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाबळेश्वर येथे आलेल्या महसूल मंत्र्यांसमोरच श्री. पांचाळ यांनी शहरातील विकास कामांबद्दलची व्यथा आणि नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे वास्तव मांडले.

*महसूल मंत्र्यांचे आश्वासन:*

महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री. पांचाळ यांच्या तक्रारीतील विविध विषयांचे गांभीर्य तत्काळ ओळखले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी लावून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे.

महाबळेश्वर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कोट्यवधी रुपयांच्या निधीतील भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामांचा मुद्दा ऐरणीवर आल्याने शहराच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे महामंत्री राजेशजी पांङे, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विठ्ठलजी बलशेटवार, विधान सभेच्या प्रमुख सुरभी ताई भोसले, महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवक पदाचे उमेदवार रविंद्रजी कुंभारदरे, मनिषजी मोहिते, अश्विनी ढेबे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते राजेंद्रजी पवार, गोपाळ लालबेग, श्री फळणे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl