रायगड कॉर्नरवर देशी दारूची अवैध वाहतूक उघड; दुचाकीसह ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त


रायगड कॉर्नरवर देशी दारूची अवैध वाहतूक उघड; दुचाकीसह ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

खताच्या पिशवीत लपवून देशी दारूची वाहतूक; सेलू शहर पोलिसांची कारवाई, तरुण ताब्यात

उत्तम लोखंडे
परभणी / सेलू प्रतिनिधी

सेलू शहर पोलिसांनी रायगड कॉर्नर परिसरात छापा टाकून विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी देशी दारूसह दुचाकी असा एकूण ५५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवारी (दि. २५) रात्री सुमारे ८.२० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायगड कॉर्नर येथील राजस्थानी स्वीट मार्टसमोरील रस्त्यावर एक तरुण दुचाकीवर खताची पिशवी घेऊन संशयास्पदरीत्या थांबला असल्याची माहिती सेलू शहर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित तरुणाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याची दुचाकी तपासली असता दुचाकीवर ठेवलेल्या पांढऱ्या खताच्या पिशवीमध्ये भिंगरी संत्रा देशी दारूचे चार खाकी पुठ्ठ्याचे बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये १८० मिली क्षमतेच्या ४८ सीलबंद काचेच्या बाटल्या होत्या. अशा एकूण १९२ बाटल्या पोलिसांच्या हाती लागल्या.

जप्त करण्यात आलेल्या देशी दारूची किंमत १५ हजार ३६० रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या प्लेटिना दुचाकीची किंमत ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दारू व दुचाकी असा एकूण ५५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव रोहित संतोष शेळके (रा. फुलेनगर, सेलू) असे आहे. सदर देशी दारू आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

सेलू शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहर परिसरात विनापरवाना दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात पोलिसांकडून कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाण्याची शक्यता आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl