परभणीत रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेना पक्ष मेळाव्यात साधणार कार्यकर्त्यांशी संवाद
परभणीत रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेना पक्ष मेळाव्यात साधणार कार्यकर्त्यांशी संवाद
परभणी प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते परभणी येथे आयोजित शिवसेना पक्ष मेळाव्यास उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच विविध शिष्टमंडळांच्या भेटी घेऊन त्यांच्या मागण्या व प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी सकाळी मुंबई विमानतळावरून विमानाने नांदेडकडे रवाना होतील. दुपारी १२.१५ वाजता नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते परभणीकडे प्रयाण करतील. दुपारी १२.४५ वाजता परभणी येथील पोलीस परेड मैदानावरील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होणार आहे.
यानंतर दुपारी १ वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना पक्ष मेळाव्यास उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात ते शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, आगामी राजकीय व संघटनात्मक वाटचालीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्ष मेळाव्यानंतर दुपारी २ वाजता विविध शिष्टमंडळांच्या भेटींसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. या भेटीदरम्यान स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न, विकासकामे तसेच नागरिकांच्या मागण्यांबाबत शिष्टमंडळांकडून निवेदने सादर केली जाण्याची शक्यता आहे.
दौऱ्याच्या शेवटी दुपारी ३ वाजता मोटारीने पोलीस परेड मैदानावरील हेलिपॅडकडे ते रवाना होतील. त्यानंतर दुपारी ३.१५ वाजता हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करून परभणी दौरा संपणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यामुळे परभणीतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्ष मेळाव्याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment