धावण्याच्या शर्यतीत वरद भिसेची दमदार बाजी; ६०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड



धावण्याच्या शर्यतीत वरद भिसेची दमदार बाजी; ६०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

✍️उत्तम लोखंडे

सेलू/परभणी | प्रतिनिधी —

मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयाच्या मैदानावर ८ ऑगस्ट रोजी झालेल्या अॅथलेटिक्स राज्यस्तरीय निवड चाचणी मॅरेथॉन स्पर्धेत भारतीय बाल विद्यामंदिर, परभणीचा विद्यार्थी वरद दत्तात्रय भिसे याने उल्लेखनीय कामगिरी करत १६ वर्षांखालील वयोगटातील ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

वरदने आपल्या उत्कृष्ट वेगाचे, सातत्यपूर्ण सरावाचे आणि जिद्दीचे दर्शन घडवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची २९ ऑगस्ट रोजी डेरवण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत वरद हा परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

वरदच्या या यशामागे त्याचे वडील तथा राष्ट्रीय कबड्डीपटू दत्तात्रय भिसे तसेच क्रीडा शिक्षक यमनाजी भालशंकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. नियमित सराव, शारीरिक तंदुरुस्ती आणि स्पर्धात्मक तयारी यामुळे वरदने कमी वयातच क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने वरदच्या कुटुंबीयांसह शिक्षक, मित्र आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय बाल विद्यामंदिर, परभणीचे मुख्याध्यापक श्री. शेडगे सर यांनी वरदचे अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना वरदने यापुढेही अशीच दमदार कामगिरी करावी आणि राज्यस्तरावर आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वरदच्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl