माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांचा शिवसेना उमेदवारांसाठी तळदेव परिसरात जोरदार प्रचार

माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांचा शिवसेना उमेदवारांसाठी तळदेव परिसरात जोरदार प्रचार

तळदेव प्रतिनिधी : 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गट तसेच तळदेव आणि वाडा कुंभारोशी गणात शिवसेनेचा प्रचार वेग घेत असून या प्रचाराची धुरा या भागाचे सुपुत्र माजी आमदार श्री. दगडू दादा सकपाळ यांनी स्वतः हातात घेतली आहे. गावोगावी प्रत्यक्ष भेटी, सभा आणि संवादाच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत असून त्यामुळे परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काल तळदेव येथे तळदेव, विवर आणि देवळी पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थांची मोठी सभा पार पडली. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सभेत गावातील पाणी, रस्ते, शेती, वीज, रोजगार आणि शासकीय कामकाजाशी संबंधित विविध अडचणी नागरिकांनी मांडल्या. त्यावर बोलताना माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेली विकासकामे लोकांसमोर मांडली. महाराष्ट्राचे नेतृत्व आपलाच माणूस करत असून त्याला एकजुटीने साथ देण्याची गरज आहे, असे सांगत त्यांनी शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. निवडून आल्यानंतर आपल्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव पुढे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या प्रचार दौऱ्यादरम्यान दादांनी तळदेव येथील पुरातन मंदिरात स्वयंभू शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले. तसेच सौंदरी गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या सांगता सोहळ्यास उपस्थित राहून दीपोत्सव कार्यक्रमात सहभाग नोंदवला. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना दिलेल्या भेटींमुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या दगडू दादा सकपाळ हे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असून घरोघरी जाऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. त्यांच्या या सक्रिय प्रचारामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून प्रचाराला नवे बळ मिळाले आहे.

तळदेव येथील सभेसाठी तळदेव गटाचे उमेदवार श्री. अजित सकपाळ, पंचायत समिती तळदेव गणाचे अधिकृत उमेदवार श्री. संजय शेलार, राष्ट्रीय शिव स्वराज्य सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ, काळेश्वरी बोट क्लबचे चेअरमन श्री. आनंद सकपाळ, श्री. गणेश सकपाळ, श्री. चंदू गुरुजी सकपाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार सभेतील गर्दी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता या भागात शिवसेनेचा प्रचार प्रभावीपणे पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl