कास पठारानजीक अज्ञात व्यक्तीचा गळफास; परिसरात खळबळ

कास पठारानजीक अज्ञात व्यक्तीचा गळफास; परिसरात खळबळ

कास प्रतिनिधी (ता. ३१) :

 जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराच्या नजीक आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कास पठाराच्या मुख्य कार्यालयापुढील बाजूस, छोटा धबधबा कोसळतो त्या परिसरात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ही व्यक्ती आढळून आली.

आज सकाळच्या सुमारास तेथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तत्काळ कास पठारावरील सुरक्षेसाठी असलेल्या कास समितीच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाऊन माहिती दिली. समितीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्ती झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर या घटनेची माहिती मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना फोनवरून देण्यात आली.

मृत व्यक्तीच्या अंगावर पांढरा सदरा, खाली खाकी रंगाची नाईट पँट, कानाला काळी टोपी असून पायात सॉक्स व स्लीपर असल्याचे दिसून आले आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, वय आणि इतर तपशीलाबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत असून, पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे.

पर्यटकांची वर्दळ असलेल्या कास पठार परिसरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास मेढा पोलीस करत आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl