प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महाबळेश्वरात रक्तदानाचा सामाजिक जागर; ५३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रजासत्ताक दिनी महाबळेश्वरमध्ये रक्तदानाचा सामाजिक संदेश; रोटरी, इनरव्हील व सह्याद्री अ‍ॅडव्हेंचरचा आदर्श उपक्रम

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वर, सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर तसेच इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

या रक्तदान शिबिराची विशेष बाब म्हणजे महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेल्या पाच पर्यटकांनीही स्वयंप्रेरणेने रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे पर्यटनस्थळी येणारे नागरिकही सामाजिक जबाबदारी जपतात, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून समाजात पोहोचला.

शिबिर यशस्वी करण्यासाठी महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर बापूसाहेब सांडभोर यांनी विशेष सहकार्य केले. तसेच सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन व आरोग्य तपासणीची जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडली.

या उपक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन विजय काळे, सेक्रेटरी महेश कोमटी, शिरीष गांधी, धिरेन नागपाल, रमेश पल्लोड, दिलीप रिंगे यांनी मोलाचे योगदान दिले. सह्याद्री अ‍ॅडव्हेंचरच्या वतीने सर्वेसर्वा संजयजी पाटील सर व त्यांच्या संपूर्ण टीमने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष वर्षा पार्ठे यांच्यासह सपना अरोरा, मुक्ता कोमटी, शुभांगी खुरासने, वंदना पल्लोड, स्वाती भांगडिया यांनीही सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात स्वतः रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय काळे, महेश कोमटी आणि धिरेन नागपाल यांनी रक्तदान करून केली, ज्यामुळे उपस्थित रक्तदात्यांना प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी रोटरी अध्यक्ष विजय काळे यांनी सर्व रक्तदाते, सहकार्य करणाऱ्या संस्था, पोलीस प्रशासन, वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेला हा रक्तदान शिबिराचा उपक्रम मानवता, सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाचा उत्तम आदर्श ठरला असून महाबळेश्वरच्या सामाजिक कार्याच्या इतिहासात तो निश्चितच स्मरणीय ठरेल.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl