तळदेव–कुंभरोशी साठी भाजपची भव्य प्रचार सभा; उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे यांची उपस्थिती

तळदेव–कुंभरोशी साठी भाजपची भव्य प्रचार सभा; उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे यांची उपस्थिती

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी तीन वाजता पारसोंड, तालुका महाबळेश्वर येथील श्रीराम वरदायनी माता मंदिर परिसरात भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस माननीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले साहेब (बांधकाम मंत्री), माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब (ग्रामीण विकास मंत्री), तसेच माजी आमदार मदन दादा भोसले आणि माजी नगराध्यक्ष महाबळेश्वर डी. एम. बावळेकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तळदेव गटातील जिल्हा परिषदेचे भाजपचे अधिकृत उमेदवार सुभाष अण्णा सोंडकर आणि पंचायत समिती कुंभरोशी गणातील उमेदवार सुरेश आप्पा जाधव यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली असून, या कार्यक्रमातून भाजपच्या विकासात्मक धोरणांचा, ग्रामीण विकासाच्या कामांचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा मतदारांसमोर मांडण्यात येणार आहे.

या प्रचार सभेत उपस्थित मान्यवरांकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर मजबूत नेतृत्वाची गरज, गावविकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे ही सभा मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर पारसोंड, तळदेव, कुंभरोशी तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. ही प्रचार सभा तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिक गतिमान करणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl