मतदान यंत्रे तयारीचा कार्यक्रम उद्या; उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन
मतदान यंत्रे तयारीचा कार्यक्रम उद्या; उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवार, दि. 29 जानेवारी 2026 रोजी मतदान यंत्रांची तयारी (सिलिंग व सेटिंग) करण्याचा अधिकृत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी ठीक 9 वाजता महाबळेश्वर तहसील कार्यालय येथे होणार असून सर्व उमेदवारांनी व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या कार्यक्रमात मतदान यंत्रांची तपासणी, आवश्यक सेटिंग आणि सिलिंगची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे. निवडणुकीत कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये तसेच सर्व उमेदवारांना समान व न्याय्य प्रक्रिया सुनिश्चित व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
मतदान यंत्रांची तयारी उमेदवारांच्या उपस्थितीतच करण्यात येणार असल्याने कोणताही गैरसमज टाळता येणार असून निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होणार आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी दिलेल्या वेळेपूर्वीच तहसील कार्यालयात उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment