महाबळेश्वर एसटीच्या बसला पुन्हा ‘स्टीअरिंग लॉक’! झोलखिंडीत बस थांबली; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर काल ब्रेक फेल, आज स्टीअरिंग लॉक; मोठा अनर्थ होण्यापूर्वी एसटी प्रशासन जागे होणार का?
महाबळेश्वर एसटीच्या बसला पुन्हा ‘स्टीअरिंग लॉक’! झोलखिंडीत बस थांबली; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर काल ब्रेक फेल, आज स्टीअरिंग लॉक; मोठा अनर्थ होण्यापूर्वी एसटी प्रशासन जागे होणार का? महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर एसटी आगारातील बसच्या तांत्रिक बिघाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाबळेश्वर–तापोळा मार्गावर काल ब्रेक फेल झाल्याची घटना घडून पाच प्रवाशांना दुखापत झाल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच आज झोलखिंड परिसरात एका एसटी बसचे स्टीअरिंग लॉक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत असून, एसटी प्रशासनाच्या बस तपासणी व देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोलखिंड परिसरात प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस अचानक थांबली. बसचे स्टीअरिंग लॉक झाल्याचे सांगण्यात येत आहे. डोंगराळ भागातील वळणावळणाच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त नाही. काल ब्रेक फेल; आज स्टीअरिंग लॉक मह...