केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम यांचा १२ सप्टेंबरला सेवापूर्ती गौरव सोहळा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेला मानाचा मुजरा; तळदेव येथे दुपारी १ ते ४ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन
केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम यांचा १२ सप्टेंबरला सेवापूर्ती गौरव सोहळा
शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेला मानाचा मुजरा; तळदेव येथे दुपारी १ ते ४ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन
तापोळा प्रतिनिधी :
शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेले केंद्र मांघरचे केंद्रप्रमुख श्री. चंद्रकांत कृष्णा जंगम यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत तळदेव येथील तळेश्वर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शिक्षकांच्या कार्याला दिशा देत केंद्रप्रमुख म्हणून श्री. जंगम यांनी बजावलेल्या सेवेला यानिमित्ताने मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या सेवाकाळातील योगदानाबद्दल शिक्षक, ग्रामस्थ, सहकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे शुभहस्ते महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद पाटील (आबा) यांच्या हस्ते होणार आहेत.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे महाबळेश्वर अध्यक्ष श्री. बाबुराव संकपाळ, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. राजेंद्रशेठ राजपुरे, पंचायत समिती महाबळेश्वरच्या सभापती सौ. शकुंतला चोरमले, उपसभापती श्री. संजय मोरे, जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय केळगणे व श्री. अजित संकपाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. धोंडीबा शंकर जंगम, माजी पंचायत समिती सभापती श्री. संजय गायकवाड, पंचायत समिती सदस्य श्री. संजय शेलार व सौ. वंदना भिलारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच गटविकास अधिकारी श्री. विजय विभुते, गटशिक्षणाधिकारी श्री. प्रतीक कडू आणि तळदेव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. रामचंद्र जंगम यांच्यासह शिक्षण, प्रशासन, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा होणार गौरव
शिक्षक आणि केंद्रप्रमुख म्हणून शिक्षण क्षेत्राशी दीर्घकाळ जोडलेले असलेल्या श्री. चंद्रकांत जंगम यांच्या सेवापूर्तीचा हा सोहळा त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ठरणार आहे. त्यांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सहकारी शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांकडून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी मांघर, वेळापूर, येरणे येथील शिक्षकवृंद तसेच तळदेव ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन
सेवापूर्ती सोहळ्यास शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री. चंद्रकांत जंगम यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला अभिवादन करावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : तळेश्वर सभागृह, तळदेव, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
दिनांक : शनिवार, १२ सप्टेंबर २०२६
वेळ : दुपारी १ ते ४ वाजता
Comments
Post a Comment