शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शिल्पकार — सुनील गायकवाड नूतन विद्यालयात पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांचा सन्मान




शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शिल्पकार — सुनील गायकवाड

नूतन विद्यालयात पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

✍️उत्तम लोखंडे ,
परभणी/ सेलू प्रतिनिधी  :

 पालक शिक्षक संघाच्या वतीने नूतन विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संगीत विभागप्रमुख सच्चिदानंद डाखोरे व त्यांच्या संचाने स्वागतगीत सादर केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक के. के. देशपांडे होते. यावेळी पालक शिक्षक संघाचे सहसचिव सुनील गायकवाड, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा हेमा मुळे, पूनम सोनी, कैलास लाटे, रंजीतराव जाधव, प्रशांत सोळंके, शत्रुघ्न पवार, विठ्ठल जाधव, पंकज चव्हाण, राजेभाऊ लेंगुळे आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डी. बी. घोगरे व त्यांच्या पत्नी मथुरा घोगरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व पेन देऊन सन्मान करण्यात आला. दि. ५ सप्टेंबर २०२५ ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. गणेश माळवे, सुरेश हिवाळे व राजेंद्र सोनवणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना पालक शिक्षक संघाचे सहसचिव सुनील गायकवाड म्हणाले, “आई-वडिलांनंतर आपल्यापेक्षा आपल्या विद्यार्थ्याने मोठे व्हावे, असे फक्त शिक्षकांनाच मनापासून वाटते. शिकवलेला धडा, कवितेतून घेतलेली पाठ आणि आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शिक्षकांचा नेहमीच आपल्या पाठीशी असलेला हात अमूल्य असतो.”

तालुकास्तरीय विज्ञान नाटक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी. एस. माळवे यांनी केले. एस. जी. बोधनापोड यांनी घोगरे सर यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शैलजा कवूटकर यांनी केले, तर विजय धापसे यांनी आभार मानले.

  

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl