Posts

महाबळेश्वर–तापोळा मार्ग पुन्हा खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय कालच तात्पुरती दुरुस्ती; अवघ्या एका दिवसात रस्ता पुन्हा खचल्याने प्रशासनासमोर कायमस्वरूपी उपाययोजनेचे आव्हान

Image
महाबळेश्वर–तापोळा मार्ग पुन्हा खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय कालच तात्पुरती दुरुस्ती; अवघ्या एका दिवसात रस्ता पुन्हा खचल्याने प्रशासनासमोर कायमस्वरूपी उपाययोजनेचे आव्हान महाबळेश्वर, दि. २७ (प्रतिनिधी): महाबळेश्वर–तापोळा या महत्त्वाच्या पर्यटन व दळणवळणाच्या मार्गावर कारवीआळा परिसरात रस्ता पुन्हा मोठ्या प्रमाणात खचल्याने रविवारी सकाळपासून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कालच महाबळेश्वर नगरपालिकेने युद्धपातळीवर तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या एका दिवसात रस्ता पुन्हा खचल्याने प्रशासनाच्या तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारवीआळ्याच्या पुढील भागात रस्ता अधिकच खचल्याने तेटली, येरण आणि तापोळा या भागांकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या गावांतील नागरिक कारवीआळा परिसरात अडकून पडले असून, अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, महाबळेश्वर–तापोळा एसटी बससेवाही रस्त्या...

देवसरेतील मुसळधार पावसाने गरीब कुटुंबाचे घर उद्ध्वस्त; भिवाजी जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरपंचांची ग्वाही

Image
देवसरेतील मुसळधार पावसाने गरीब कुटुंबाचे घर उद्ध्वस्त; भिवाजी जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरपंचांची ग्वाही ✍️ संतोष मालुसरे, तापोळा प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका देवसरे गावालाही बसला असून, गावातील भिवाजी रामचंद्र जाधव यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणाऱ्या जाधव कुटुंबावर या घटनेमुळे मोठे संकट ओढवले असून, त्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. सततच्या पावसामुळे घराच्या एका बाजूची भिंत कोसळल्याने घर असुरक्षित झाले आहे. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील पावसात आणखी नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे जाधव कुटुंबासमोर निवाऱ्याचा आणि आर्थिक अडचणींचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, या घटनेबाबत देवसरेचे सरपंच मारुती जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, भिवाजी जाधव हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून, त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती शासनापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून आवश्...

महाबळेश्वर–तापोळा मार्गाच्या दुरुस्तीची मागणी तीव्र; 'काम न झाल्यास १०५ गावांचा तीव्र आंदोलनाचा इशारा'आराम चौक ते कारवी आळा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था; मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या सूचनांनंतरही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप

Image
महाबळेश्वर–तापोळा मार्गाच्या दुरुस्तीची मागणी तीव्र; 'काम न झाल्यास १०५ गावांचा तीव्र आंदोलनाचा इशारा' आराम चौक ते कारवी आळा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था; मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या सूचनांनंतरही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप महाबळेश्वर : प्रतिनिधी महाबळेश्वर–तापोळा हा १०५ गावांसाठी जीवनवाहिनी मानला जाणारा प्रमुख दळणवळण मार्ग असून, या मार्गावरील आराम चौक ते कारवी आळा दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांघर गावचे सरपंच गणेश जाधव यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत, रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास १०५ गाव समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी या परिसराला भेट दिली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ...

महाबळेश्वर–तापोळा मार्ग युद्धपातळीवर दुरुस्त; नगरपालिकेची तातडीची कारवाई, दुपारपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न खचलेल्या मोरीमुळे बंद झालेल्या रस्त्यावर युद्धपातळीवर काम सुरू; जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ घटनास्थळी, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Image
महाबळेश्वर–तापोळा मार्ग युद्धपातळीवर दुरुस्त; नगरपालिकेची तातडीची कारवाई, दुपारपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न खचलेल्या मोरीमुळे बंद झालेल्या रस्त्यावर युद्धपातळीवर काम सुरू; जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ घटनास्थळी, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य महाबळेश्वर : प्रतिनिधी महाबळेश्वर–तापोळा या महत्त्वाच्या पर्यटन मार्गावरील एमपीजी क्लबजवळील दोन नंबर मोरी खचल्याने शुक्रवारी रात्री वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळपासून महाबळेश्वर नगरपालिकेने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत खडी, मुरूम आणि आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरू असून, दुपारपर्यंत वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मुसळधार पावसामुळे मोरीचा मोठा भाग खचल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे कोणताही अपघात होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांना काहीसा त्रास सहन...

आंबेनळी घाटात सलग तिसऱ्यांदा दरड; मेटतळे परिसरात मोठे दगड रस्त्यावर, एमएसआरडीसीच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा संताप पर्यटक व स्थानिकांनी स्वतः दगड हटवून वाहतूक सुरू केली; अधिकाऱ्यांकडून फोनला प्रतिसाद नसल्याची तक्रार

Image
आंबेनळी घाटात सलग तिसऱ्यांदा दरड; मेटतळे परिसरात मोठे दगड रस्त्यावर, एमएसआरडीसीच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा संताप पर्यटक व स्थानिकांनी स्वतः दगड हटवून वाहतूक सुरू केली; अधिकाऱ्यांकडून फोनला प्रतिसाद नसल्याची तक्रार महाबळेश्वर, प्रतिनिधी : महाबळेश्वर–कुंभरोशी मार्गावरील आंबेनळी घाटातील मेटतळेच्या खालील भागात सलग तिसऱ्यांदा छोट्या प्रमाणात दरड कोसळल्याची घटना घडल्याने वाहनचालक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी या ठिकाणी दोन मोठे दगड थेट रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा अपघात झाला नसला तरी मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. घटनेनंतर तेथून प्रवास करणारे पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांनी तत्परता दाखवत रस्त्यावर पडलेले काही दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र, डोंगरकड्यावर अजूनही सैल दगड आणि माती असल्याने पुढील काळात मोठी दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असून...

महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील मोरी खचली; रस्ता रात्री बंद

Image
महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील मोरी खचली; रस्ता रात्री बंद नगरपालिका हद्दीतील रस्त्याची दुरवस्था पुन्हा ऐरणीवर; भूमिपूजनानंतरही काम सुरू नसल्याने नागरिक संतप्त महाबळेश्वर : प्रतिनिधी महाबळेश्वर–तापोळा या अत्यंत महत्त्वाच्या पर्यटन मार्गावर एमपीजी क्लब पासून पुढे दोन नंबर  मोरी खचल्याने तसेच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने शुक्रवारी सायंकाळी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सतर्क केले. रात्रीच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून अखेर हा मार्ग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी अनेक वर्षांपासून मोरीची समस्या कायम असून प्रत्येक पावसाळ्यात रस्त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. यंदाही मुसळधार पावसामुळे मोरी खचल्याने रस्त्याचा मोठा भाग धोकादायक बनला आहे. त्यामुळे हलकी वाहनेही धोक्यातून मार्गक्रमण करत असल्याचे प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले. अनेकांनी रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याची मागणी केली. या घटनेच...

प्रती पंढरपूर निपाणीत आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी; भाविकांची मोठी गर्दी, दिंडी सोहळ्याने परिसर दुमदुमला

Image
प्रती पंढरपूर निपाणीत आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी; भाविकांची मोठी गर्दी, दिंडी सोहळ्याने परिसर दुमदुमला तापोळा  प्रतिनिधी जावळी तालुक्यातील प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या निपाणी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव शनिवारी अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. "विठ्ठल... विठ्ठल..." या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. उत्सवाची सुरुवात पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या महाअभिषेकाने झाली. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. दिवसभर भजन, नामस्मरण आणि हरिपाठाचे कार्यक्रम रंगले. यानंतर निपाणीसह परिसरातील गावांमध्ये पारंपरिक दिंडी सोहळा काढण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. उत्सवानिमित्त मंदिरात आलेल्या भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कोयना, सोळशी, ...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!