Posts

मोबाईल हरवला नव्हता, हरवली होती संवेदनशीलता!एस.टी.च्या एका प्रवासाने निर्माण केलेला अस्वस्थ करणारा प्रश्न

Image
मोबाईल हरवला नव्हता, हरवली होती संवेदनशीलता! एस.टी.च्या एका प्रवासाने निर्माण केलेला अस्वस्थ करणारा प्रश्न लेखक : अमर सलागरे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.टी. महामंडळाशी राज्यातील सर्वसामान्य माणसाचे एक वेगळे नाते आहे. ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एस.टी. ही केवळ वाहतुकीचे साधन नसून त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य प्रवासी आजही मोठ्या विश्वासाने एस.टी.चा वापर करतात. मात्र नुकत्याच झालेल्या एका प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेने हा विश्वास आणि त्यामागील मानवी संवेदनशीलता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. अनेक वर्षांनंतर एस.टी.ने प्रवास करण्याचा योग आला. महाड ते कापडे हा माझा प्रवास MH 14 BT 4302 क्रमांकाच्या ठाणे–महाबळेश्वर बसमधून सुरू होता. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र पोलादपूर येथे घडलेल्या एका प्रसंगाने मन विषण्ण झाले. पोलादपूर बसस्थानकावर एक वयोवृद्ध गृहस्थ बसमध्ये चढले. बस सुटल्यानंतर काही क्षणांतच त्यांच्या लक्षात आले की त्यांचा मोबाईल फोन...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गिरीस्थान प्रशालेत योगमय वातावरण; विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्यदायी जीवनाचे धडे

Image
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गिरीस्थान प्रशालेत योगमय वातावरण; विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्यदायी जीवनाचे धडे महाबळेश्वर | प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विश्वबंधुत्व फाउंडेशन, महाबळेश्वर आणि गिरीस्थान प्रशाला, महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गिरीस्थान प्रशालेच्या प्रांगणात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाच्या कृतींचा सराव करत योगाचे धडे गिरवले. कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होते, तसेच निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त असल्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी विश्वबंधुत्व फाउंडेशनचे संस्थापक सतीश साळुंखे, गिरीस्थान प्रशालेचे शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक...

शिक्षणासाठी सेवाभावाचा हात; श्री हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेकडून २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर व छत्री वाटप

Image
शिक्षणासाठी सेवाभावाचा हात; श्री हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेकडून २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर व छत्री वाटप पोलादपूर | प्रतिनिधी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळावे या उद्देशाने श्री हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील कापडे विभागातील पितळवाडी आणि कामथे विभागातील मोरसडे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या ११ व्या वर्धापन वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दप्तर तसेच पावसाळी छत्र्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केली. शैक्षणिक साहित्याबरोबरच पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा...

पावसाची ओढ, मोकाट जनावरांचा उपद्रव; कुंभरोशी-हरोशी परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात

Image
पावसाची ओढ, मोकाट जनावरांचा उपद्रव; कुंभरोशी-हरोशी परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात प्रतापगड | प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी, जावली व हरोशी परिसरातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत असून पावसाच्या अनियमिततेसोबतच मोकाट जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. एकीकडे पावसाने अपेक्षित साथ दिलेली नसताना दुसरीकडे पेरलेल्या व नुकत्याच उगवलेल्या पिकांवर मोकाट गाईगुरे ताव मारत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यंदा मान्सूनचे आगमन झाले असले तरी पावसाचा जोर कमी असल्याने शेतीची कामे अडचणीत आली आहेत. पावसाच्या भरवशावर असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी भात, नाचणी, वरी तसेच इतर खरीप पिकांची पेरणी केली आहे. काही ठिकाणी पिके उगवण्यास सुरुवात झाली असतानाच मोकाट गाईगुरांनी शेतांमध्ये घुसून कोवळ्या पिकांची नासधूस सुरू केली आहे. त्यामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट उभे राहिले आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिवसा आणि रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे शेतांमध्ये मुक्तपणे वावरत असून पिकांच...

उद्योजकांच्या प्रश्नांना मिळणार नवी दिशा; रोहन जंगम यांची रिपाई (आ) महाबळेश्वर तालुका उद्योजक आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती

Image
उद्योजकांच्या प्रश्नांना मिळणार नवी दिशा; रोहन जंगम यांची रिपाई (आ) महाबळेश्वर तालुका उद्योजक आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती महाबळेश्वर | प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यातील युवा उद्योजक श्री. रोहन जंगम यांची महाबळेश्वर तालुका उद्योजक आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योजकांच्या विविध समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासोबतच नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाबळेश्वर तालुक्यात पर्यटन, सेवा आणि लघुउद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांसमोरील विविध अडचणी, शासकीय योजनांचा लाभ, व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक सुविधा तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी उद्योजक आघाडी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या नियुक्तीप्रसंगी वाई पंचायत समिती सदस्य श्री. स्वप्निल गायकवाड यांनी आदरणीय अशोक बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार श्री. र...

महाबळेश्वरच्या विकासकामांतील त्रुटींवर नगराध्यक्षांचा एल्गार; PWD च्या अर्धवट आणि निकृष्ट कामांची होणार प्रत्यक्ष चौकशी

Image
महाबळेश्वरच्या विकासकामांतील त्रुटींवर नगराध्यक्षांचा एल्गार; PWD च्या अर्धवट आणि निकृष्ट कामांची होणार प्रत्यक्ष चौकशी महाबळेश्वर | प्रतिनिधी महाबळेश्वर शहरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) सुरू असलेल्या विविध विकासकामांतील त्रुटी, अपूर्णता आणि निकृष्ट दर्जाबाबत वाढत्या नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेचे सुशोभीकरण, मरी पेठ रस्त्याचे डांबरीकरण, गटार व्यवस्था, विद्युत सुविधा तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्तेची सखोल तपासणी करण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी घेतला आहे. महाबळेश्वर हे राज्यासह देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ मानले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देत असल्याने शहरातील पायाभूत सुविधा दर्जेदार, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या काही विकासकामांचा दर्जा समाधानकारक नसल्याचे चित्र समोर येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आह...

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मनोज जाधव यांना ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार’ जाहीर

Image
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मनोज जाधव यांना ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार’ जाहीर वाई | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार’ यंदा नामदार भरतशेठ गोगावले यांचे स्वीय सहाय्यक तथा सहायक कृषी अधिकारी मनोज सुमन मोहन जाधव यांना जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतकरी हितासाठी केलेले योगदान आणि लोकाभिमुख सेवाभावाची दखल घेत शासनाने हा सन्मान जाहीर केला असून येत्या १ जुलै कृषीदिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वाई येथील मूळ रहिवासी असलेल्या मनोज जाधव यांनी आपल्या सेवाकाळात कृषी क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण आणि मार्गदर्शक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे जलकुंड उपचार आधारित फळबाग लागवडीचा अभिनव प्रयोग यशस्वी करून त्याला शासनमान्यता मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच देवपूर येथे भात टोकण शेतीचा यशस्वी प्रयोग राबवून शेतकऱ्यांसाठी ...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!