आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गिरीस्थान प्रशालेत योगमय वातावरण; विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्यदायी जीवनाचे धडे

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गिरीस्थान प्रशालेत योगमय वातावरण; विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्यदायी जीवनाचे धडे

महाबळेश्वर | प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विश्वबंधुत्व फाउंडेशन, महाबळेश्वर आणि गिरीस्थान प्रशाला, महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गिरीस्थान प्रशालेच्या प्रांगणात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाच्या कृतींचा सराव करत योगाचे धडे गिरवले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होते, तसेच निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त असल्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

यावेळी विश्वबंधुत्व फाउंडेशनचे संस्थापक सतीश साळुंखे, गिरीस्थान प्रशालेचे शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि योगाविषयीची जिज्ञासा यामुळे संपूर्ण परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला होता.

योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी योग हा प्रभावी आणि सर्वसमावेशक मार्ग असल्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वबंधुत्व फाउंडेशन आणि गिरीस्थान प्रशालेच्या शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl