Posts

वाचन संस्कृती संवर्धनासाठी महाबळेश्वरमध्ये ऑनलाईन व्याख्यानमाला

Image
वाचन संस्कृती संवर्धनासाठी महाबळेश्वरमध्ये ऑनलाईन व्याख्यानमाला युवाशक्ती या विषयावर मा. श्री. जगन्नाथ शिंदे यांचे मार्गदर्शन   जितेंद्र कारंडे, प्रतापगड प्रतिनिधी : पंचायत समिती महाबळेश्वर व प्राथमिक शिक्षक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन संस्कृती संवर्धनाय शारदीय ऑनलाईन व्याख्यानमाला” या उपक्रमाला सुरुवात होत आहे. या व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत वाचनाची गोडी वाढावी, ज्ञानाची ओढ निर्माण व्हावी आणि समाजातील सकारात्मक विचारांचा प्रसार व्हावा हा उद्देश ठेवण्यात आला आहे. 🌹 प्रथम पुष्प या उद्घाटन सत्रात “ युवाशक्ती ” हा विषय घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी मा. श्री. जगन्नाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हे व्याख्यान रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० ते ८.३० या वेळेत Google Meet या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणार आहे. 👉 सहभागी होण्यासाठी Google Meet लिंक – https://meet.google.com/dfv-qooz-ddm किंवा कोड: dfv-qooz-ddm टाकून प्रवेश करता येईल. व्यसनमुक्त युवक संघामार्फत राज्यभर...

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर : भात व स्ट्रॉबेरी शेती संकटात, शेतकरी हवालदिल

Image
महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर : भात व स्ट्रॉबेरी शेती संकटात, शेतकरी हवालदिल   जितेंद्र कारंडे,  प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यात यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी संकटाचे ढग घेऊन आला आहे. नऊ मेपासून सुरू झालेला आणि अविरत सुरू असलेला मुसळधार पाऊस सलग सहा महिन्यांपासून कोसळत असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते, पूल, नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत,  ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतीला बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. भात शेतीवर निळे भुंगेरे रोगाचा प्रादुर्भाव तालुक्यातील भात शेती हे प्रमुख पीक असून ते पावसावर अवलंबून आहे. सध्या रोपे हिरवीगार दिसत असली तरी पाणथळ झालेल्या शेतांमध्ये रोपे कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यात भर म्हणजे भात शेतीवर निळे भुंगेरे (Leaf Folder) या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही किड पानांना दुमडून आतून कुरतडते, ज्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रिया विस्कळीत होते, झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादनावर गंभीर परिणाम होतो. हरोशी गावचे युवा शेतकरी एकनाथ उतेकर यांनी सांगि...

पोलादपूर तालुक्यात प्रथमच रिव्हर राफ्टिंगचा शुभारंभसाहसी पर्यटनाचे नवे दार; स्थानिकांना रोजगाराची संधी

Image
पोलादपूर तालुक्यात प्रथमच रिव्हर राफ्टिंगचा शुभारंभ साहसी पर्यटनाचे नवे दार; स्थानिकांना रोजगाराची संधी प्रकाश कदम  पोलादपूर प्रतिनिधी – नरवीर ग्रुप नेहमीच विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच युवकाभिमुख उपक्रमांसाठी ओळखला जातो. या परंपरेला पुढे नेत आता त्यांनी “ नरवीर अँडव्हेंचर अँड स्पोर्ट्स पोलादपूर ” या उपक्रमांतर्गत तालुक्यात प्रथमच साहसी पर्यटनाची नवी दिशा दिली आहे. बाजीरे धरण ते लोहारे या मनोहर निसर्गरम्य परिसरात रिव्हर राफ्टिंगची सुरुवात झाली असून यामुळे पोलादपूर तालुक्याच्या पर्यटन इतिहासात एक नवीन पर्व सुरू झाले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन या उपक्रमाचा शुभारंभ युवासेना कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते झाला. या वेळी माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार, पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, नरवीर ग्रुपचे प्रमुख रामदास कळंबे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यटनाला चालना आणि रोजगारनिर्मिती या उपक्रमामुळ...

माझं गाव माझी बातमी – आजच्या ठळक घडामोडी (२७ सप्टेंबर २०२५)

Image
माझं गाव माझी बातमी – आजच्या ठळक घडामोडी (२७ सप्टेंबर २०२५) 1. प्रतापगड मशाल महोत्सव ऐन पावसातही ३६६ मशालींनी उजळलेला प्रतापगड; हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग, ढोल-ताशांचा गजर आणि आतिषबाजीत इतिहास जिवंत झाला. 2. पांगरी गावात बिबट्याचे दर्शन वेशी परिसरात बिबट्या दिसला; महेंद्र पांगारे यांनी मोबाईलमध्ये छायाचित्र कैद केले; वनविभागाला तातडीने माहिती. 3. खटाव तालुक्यातील पुराची घटना पुराच्या पाण्यात एक जण वाहून गेला; घटना कॅमेऱ्यात कैद; प्रशासन शोधमोहीम सुरू. 4. पुसेगावमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण मद्यधुंद कारचालकाने दोन दुचाकीस्वारांना मागून धडक दिली; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. 5. माण तालुक्यात जलप्रलय दुष्काळी माण तालुका पावसामुळे जलमय; माणगंगा नदीला पूर; प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा. 6. पाचगणीत महिला स्वसंरक्षण कार्यशाळा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना आणि विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे. 7. धनगर समाजाचा आरक्षण लढा महाबळेश्वर तालुक्यात युवक नेते प्रशांत आखाडे यांचे नेतृत्व; अनुसूचित ...

प्रतापगड मशाल महोत्सव : ऐन पावसातही तुफान गर्दी, ३६६ मशालींनी उजळला इतिहास

Image
प्रतापगड मशाल महोत्सव : ऐन पावसातही तुफान गर्दी, ३६६ मशालींनी उजळला इतिहास  प्रकाश कदम/जितेंद्र कारंडे/राजेश सोंडकर  प्रतापगड प्रतिनिधी : ऐन पावसात आणि प्रतिकूल हवामानातही हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री प्रतापगडावर पार पडलेला मशाल महोत्सव अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्यात ३६६ मशालींच्या तेजाने संपूर्ण गड उजळून निघाला, तर "जय भवानी – जय शिवाजी"च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. सन २०१० पासून चंद्रकांत आप्पा उतेकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेला मशाल महोत्सव गेली सोळा वर्षे अखंडितपणे पार पडत आहे. यंदा पावसाचा जोर दिवसभर कायम होता. आंबेनळी घाटातील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांना मोठ्या कष्टाने गडावर पोहोचावे लागले. तरीही अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार व्हावे, या इच्छेने हजारो शिवभक्त गडाकडे रवाना झाले.  तुफान गर्दी – पायऱ्यांवर आणि रस्त्यांवर लोंढा गडाच्या पायऱ्या, माची परिसर आणि सभोवताली संपूर्ण गर्दी उसळली होती. प्रतापगड पार्किंगपासून शिवदुर्ग धाबा, प्रतापगड माची हस्तकला केंद्रापर्यंत वाहनांचा जथा दिसून येत हो...

प्रतापगड मशाल महोत्सव : ३६६ मशालींनी उजळला प्रतापगड, पावसाच्या सरी-धुक्याच्या दुलईत इतिहास जिवंत

Image
प्रतापगड मशाल महोत्सव : ३६६ मशालींनी उजळला प्रतापगड, पावसाच्या सरी-धुक्याच्या दुलईत इतिहास जिवंत जितेंद्र कारंडे,  प्रतापगड प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि आई भवानीचे आशिर्वाद घेऊन तेजोमय झालेला प्रतापगड शनिवारी रात्री पुन्हा एकदा उजळून निघाला. नवरात्रोत्सवानिमित्त पार पडलेल्या प्रतापगड मशाल महोत्सवात ३६६ मशालींच्या प्रकाशाने गड झगमगाटला, तर जय भवानी–जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. विशेष म्हणजे, पावसाच्या सरी आणि धुक्याच्या दुलईने या सोहळ्याला अवर्णनीय रुप दिले. मशालींचा लालसर प्रकाश धुक्यात मिसळून गडावर स्वर्गीय वातावरण निर्माण झाले. पावसाच्या थेंबांमध्ये चमकणाऱ्या मशाली जणू स्वराज्याच्या अढळ ज्योतीचे प्रतीक वाटत होत्या. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, अग्नीकलेचे मोहक प्रयोग आणि हजारो शिवभक्तांचा उत्साह यांनी संपूर्ण परिसर जिवंत झाला. पावसाच्या रिप्रेपसुद्धा भक्तांचा उत्साह कमी करू शकला नाही; उलट पावसात भिजत जयघोष करणारे शिवभक्त पाहून गडावरचे वातावरण अधिकच थरारक बनले. या सोहळ्याच्या तयारीसाठी स्वस्तिक ग्रुप पालघर, शिवमुद्रा प्रतिष्ठा...

खटाव तालुक्यात एरळा नदीच्या पुलावरून व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून; घटना कॅमेऱ्यात कैद

Image
खटाव तालुक्यात एरळा नदीच्या पुलावरून व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून; घटना कॅमेऱ्यात कैद खटाव प्रतिनिधी :  सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-ओढ्यांना पूर आला असून नदीपात्रांतील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. अशातच खटाव तालुक्यातील अंबवडे–गोरेगाव रस्त्यावर असलेल्या एरळा नदीच्या पुलावरून एक व्यक्ती वाहून गेल्याची धक्कादायक घटना  घडली. ही घटना उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली असून परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार, अंबवडे–गोरेगाव रस्त्यावरील पुलावरून जोरात पाणी वाहत होते. तरीदेखील एका व्यक्तीने पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रचंड वेगाने येणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने ती व्यक्ती पुराच्या लाटेत वाहून गेली. वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश रघुनाथ गायकवाड (रा. अंबवडे) असे समोर आले आहे. प्रशासनाची धावपळ घटनेची माहिती मिळताच पोलिस, तलाठी, पोलीस पाटील तसेच शासकीय यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या मदती...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!