वाचन संस्कृती संवर्धनासाठी महाबळेश्वरमध्ये ऑनलाईन व्याख्यानमाला
युवाशक्ती या विषयावर मा. श्री. जगन्नाथ शिंदे यांचे मार्गदर्शन
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी :
पंचायत समिती महाबळेश्वर व प्राथमिक शिक्षक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन संस्कृती संवर्धनाय शारदीय ऑनलाईन व्याख्यानमाला” या उपक्रमाला सुरुवात होत आहे. या व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत वाचनाची गोडी वाढावी, ज्ञानाची ओढ निर्माण व्हावी आणि समाजातील सकारात्मक विचारांचा प्रसार व्हावा हा उद्देश ठेवण्यात आला आहे.
🌹 प्रथम पुष्प या उद्घाटन सत्रात “युवाशक्ती” हा विषय घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी मा. श्री. जगन्नाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हे व्याख्यान रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० ते ८.३० या वेळेत Google Meet या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणार आहे.
👉 सहभागी होण्यासाठी Google Meet लिंक – https://meet.google.com/dfv-qooz-ddm
किंवा कोड: dfv-qooz-ddm टाकून प्रवेश करता येईल.
व्यसनमुक्त युवक संघामार्फत राज्यभर युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीचे कार्य सातत्याने सुरू असून, समाजाच्या उन्नतीसाठी युवाशक्तीचा योग्य वापर कसा करावा याबाबत श्री. शिंदे यांनी मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
या व्याख्यानमालेमुळे वाचनसंस्कृतीसोबतच बौद्धिक देवाणघेवाण, विचारांचे चिंतन आणि सामाजिक जागरूकता यांना चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
📚 सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती पंचायत समिती महाबळेश्वर व प्राथमिक शिक्षक वाचनालय यांच्या वतीने करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment