मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त हिंदी विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे विमोचन


मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त हिंदी विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे विमोचन

‘हिंदी साहित्य में देशभक्ति का स्वर, त्याग और बलिदान की शौर्यगाथा’ या विषयावर विद्यार्थ्यांचा उपक्रम

उत्तम लोखंडे
सेलू प्रतिनिधी :

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि हिंदी दिनाचे औचित्य साधून नूतन महाविद्यालय, सेलू येथील हिंदी विभागाच्या वतीने ‘हिंदी साहित्य में देशभक्ति का स्वर, त्याग और बलिदान की शौर्यगाथा’ या विषयावर भित्तिपत्रकाचे आयोजन करण्यात आले. या भित्तिपत्रकाच्या माध्यमातून हिंदी साहित्यातील देशभक्तीची भावना, स्वातंत्र्यलढ्यातील त्याग आणि बलिदानाची शौर्यगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली.

या भित्तिपत्रकाचे विमोचन नूतन विद्यालय संस्थेचे संस्थाध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया, नाना पावडे, दिग्रसकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम राठोड आणि उपप्राचार्य डॉ. आर. एम. खाडप यांच्या हस्ते करण्यात आले.

भित्तिपत्रकाचे संपादन विद्यार्थीनी प्रतीक्षा खरात, शीतल पावडे आणि ज्ञानेश्वरी जाधव यांनी केले. त्यांना हिंदी विभागप्रमुख डॉ. ए. सी. पत्की, डॉ. पुरुषोत्तम व्यवहारे आणि डॉ. सत्वशीला माने यांनी मार्गदर्शन केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करून देतानाच हिंदी साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना साहित्य, इतिहास आणि राष्ट्रीय मूल्यांची सांगड घालण्याची संधी मिळाली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl