नूतन महाविद्यालयात क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
नूतन महाविद्यालयात क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
इतिहास विभागाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन
✍️उत्तम लोखंडे,
सेलू प्रतिनिधी :
नूतन महाविद्यालय, सेलू येथील इतिहास विभागाच्या वतीने क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या स्टाफ रूममध्ये दुपारी १.३० वाजता हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. सी. राठोड, उपप्राचार्य डॉ. आर. एम. खाडप, डॉ. विशाल पाटील, पर्यवेक्षक प्रा. प्रविण सोनवणे, ग्रंथपाल डॉ. मोहन काटकर यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरोधात धैर्याने संघर्ष केला. त्यांच्या जीवनकार्याने स्वातंत्र्य, स्वाभिमान, धैर्य आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकाराची प्रेरणा दिली. त्यांच्या संघर्षाची परंपरा आजच्या पिढीला सामाजिक बांधिलकी आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी आहे, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
इतिहास विभागाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पूर्वपीठिका, लोकप्रतिरोधाच्या चळवळी, क्रांतिकारी आंदोलन तसेच स्थानिक स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाची ऐतिहासिक ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांनी क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या विचारांचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाच्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विकास गवई यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विनायक शिंदे व श्री. हरीष बाहेती यांनी सहकार्य केले.
क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Comments
Post a Comment