परिचारिका शेख खुर्शिदा इफतेखार सेवानिवृत्त; पंचायत समितीत भावपूर्ण सत्कार
परिचारिका शेख खुर्शिदा इफतेखार सेवानिवृत्त; पंचायत समितीत भावपूर्ण सत्कार
✍️उत्तम लोखंडे,
सेलू प्रतिनिधी :
जिल्हा परिषद परभणी अंतर्गत सेलू पंचायत समिती येथे परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या शेख खुर्शिदा इफतेखार या नियमित वयोमानानुसार ३१ ऑगस्ट रोजी सेवेतून सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनिमित्त सेलू पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव यांच्या हस्ते शेख खुर्शिदा इफतेखार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी शेख खुर्शिदा इफतेखार यांच्या सेवाकाळातील योगदानाचा गौरव केला. जिल्हा परिषद परभणी अंतर्गत त्यांनी प्रथम जिल्हा परिषद विद्यालय विटा, केंद्र लिंबा, त्यानंतर माध्यमिक शाळा वालूर येथे सेवा बजावली. त्यानंतर २०१९ ते २०२६ या कालावधीत त्यांनी सेलू पंचायत समिती येथे परिचारिका म्हणून जबाबदारी पार पाडली.
आपल्या शांत, संयमी व मनमिळाऊ स्वभावामुळे शेख खुर्शिदा इफतेखार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. सहकाऱ्यांशी आपुलकीने वागत त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावली. त्यामुळे त्या सर्वांच्या लाडक्या बहिणी म्हणून परिचित होत्या, असे उदय जाधव यांनी सांगितले. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी व सुख-समाधानाचे जावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
कार्यक्रमास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव, विस्तार अधिकारी प्रभाकर शिंदे, विस्तार अधिकारी संजय कळसाईत, तसेच अतुल शहाणे, नारायण गाडेकर, खरावणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खरावणे यांनी केले, तर अतुल शहाणे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गटविकास अधिकारी उदय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी संजय कळसाईत, अतुल शहाणे, नारायण गाडेकर, परमेश्वर जाधव, आनंद भुकतर, किशोर राठोड, प्रतीक चव्हाण, सुरेश रेंगे, भराडे सर, खरावणे सर, लगड सर, रहेमान मामु, कृष्णा अंभुरे, विठ्ठल कोरडे, अनिल टेकनुर, नितीन लोखंडे, प्रशांत वाघमारे, सुनीता अंभुरे, देशपांडे मॅडम, खिलारे मॅडम, शेख कलीम, सचिन नरगर यांच्यासह पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment