मेढ्यात ८ सप्टेंबरला भव्य मोफत महाआरोग्य शिबिर; मोफत चष्मे वाटपासह विविध आजारांवर तपासणी व उपचाराची सुविधा श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त संयुक्त उपक्रम; हृदयरोग, किडनी, डोळे, कॅन्सर, मेंदू व अस्थिरोगांसह विविध आजारांची तपासणी


मेढ्यात ८ सप्टेंबरला भव्य मोफत महाआरोग्य शिबिर; मोफत चष्मे वाटपासह विविध आजारांवर तपासणी व उपचाराची सुविधा

श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त संयुक्त उपक्रम; हृदयरोग, किडनी, डोळे, कॅन्सर, मेंदू व अस्थिरोगांसह विविध आजारांची तपासणी

✍️वसंत शिर्के, 

मेटगुताड प्रतिनिधी : 

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा २०२६ निमित्त जावली व महाबळेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेढा येथील संत सेना महाराज मंदिर सभागृहात हे शिबिर होणार आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई संलग्न श्री संत सेना महाराज नाभिक समाज संघटना जावली व महाबळेश्वर तालुका, रोटरी क्लब महाबळेश्वर, विश्वंभरबाबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था मेढा (गांजे), रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन दापोली (शिक्षण, पर्यटन, पर्यावरण संस्था महाराष्ट्र राज्य) आणि सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार असून, गरजेनुसार पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. हृदयरोगासाठी ईसीजीसह अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसंदर्भात तपासणी व मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच किडनी, मूत्राशय, प्रोस्टेट आणि लघवीशी संबंधित आजारांची युरोलॉजी तपासणी करण्यात येणार आहे.

डोळ्यांची मोफत तपासणी आणि मोफत चष्मे वाटप हे या शिबिराचे विशेष आकर्षण आहे. तिरळेपणा, बुबुळ, पापणी पडणे, रेटिना तसेच डोळ्यांशी संबंधित इतर समस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी अल्पदरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याशिवाय मोफत रक्त तपासणी, कॅन्सर तपासणी, मेंदूशी संबंधित आजारांची तपासणी आणि आवश्यक शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मणका व मज्जातंतूशी संबंधित आजारांचीही तपासणी केली जाणार आहे.

कान, नाक व घसा शस्त्रक्रिया, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन, विविध प्रकारच्या हर्निया, आतड्याला पिळ पडणे, अन्ननलिकेशी संबंधित शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, फिजिओथेरपी, अस्थिरोग, दंत तपासणी व उपचार, पेसमेकर शस्त्रक्रिया, रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, डिव्हाइस क्लोजर, लहान मुलांच्या हृदयातील छिद्रांवरील उपचार, बालरोग, स्त्रीरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसह विविध आजारांसाठी तपासणी व उपचारासाठी नोंदणी केली जाणार आहे. हिप रिप्लेसमेंटसाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

“एक पाऊल आरोग्याच्या दिशेने” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा जावली व महाबळेश्वर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आरोग्य तपासणी व उपचारासाठी इच्छुक नागरिकांची नावनोंदणी शिबिराच्या ठिकाणीच करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी वेळेत उपस्थित राहून या मोफत आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा.

हे शिबिर संत सेना महाराज मंदिर सभागृह, मेढा, ता. जावली येथे, वेण्णा ज्युनिअर कॉलेजच्या शेजारी आयोजित करण्यात आले आहे. शिबिराची वेळ सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी रविंद्र पवार (कुडाळ) ९७६३२७५०७६, वसंत शिर्के (महाबळेश्वर) ९४२३३३५२६४, सूर्यकांत निकम (मेढा) ९८८१३९८६७६, बाळासाहेब शिर्के (केळघर) ९८६०६९६९७३, संजय गायकवाड (वाघेश्वर) ९६३७१८०२०३ आणि संतोष भांदिर्गे (पाणस/करहर) ९८८१९९६०६७ यांच्याशी संपर्क साधावा.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl