नूतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबिर नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार व स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नूतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबिर

नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार व स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू  प्रतिनिधी :

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यविषयक समस्या वेळेत निदर्शनास याव्यात, या उद्देशाने सेलू येथील नूतन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सेलू उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. सी. राठोड होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. खाडप, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. प्रविण सोनवणे, डॉ. अर्चना पत्की, डॉ. बी. के. कुमठेकर, डॉ. कीर्ती निराळवाड आणि डॉ. भाग्यश्री धामणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. गणेश मुळे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. या पथकात डॉ. सोनाली जाधव, रेणुका काटकमवार, सविता गऊल आणि भिसे सिस्टर यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गणेश मुळे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे नियमितपणे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आणि पौष्टिक आहार, वैयक्तिक स्वच्छता तसेच आरोग्यविषयक कोणतीही समस्या जाणवल्यास वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घेणे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. यू. सी. राठोड यांनी विद्यार्थ्यांनी आरोग्याशी संबंधित समस्या लपवू नयेत, असे आवाहन केले. कोणतीही शारीरिक किंवा आरोग्यविषयक तक्रार असल्यास वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधावा. आवश्यक तपासणी, उपचार आणि समुपदेशनाचा लाभ घेऊन आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयीन जीवनात शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्यास तसेच आरोग्याच्या समस्या वेळीच ओळखण्यास मदत होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सवयी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व समजावून देण्यात आले.

शिबिरादरम्यान मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत आवश्यक ते मार्गदर्शन केले. त्यामुळे शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेश उगले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विकास गवई यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. कीर्ती निराळवाड यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सदस्य तसेच सेलू उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने विशेष सहकार्य केले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl