महाबळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत विकासकामांसह ओबीसी आंदोलनाचा निर्धार वाई–महाबळेश्वर मार्गावरील खड्डे, श्री क्षेत्र महाबळेश्वरचा तीर्थक्षेत्र विकास, दुधगाव आरोग्य केंद्र आणि गटारींच्या कामांचा पाठपुरावा करण्याचा निर्णय

महाबळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत विकासकामांसह ओबीसी आंदोलनाचा निर्धार

वाई–महाबळेश्वर मार्गावरील खड्डे, श्री क्षेत्र महाबळेश्वरचा तीर्थक्षेत्र विकास, दुधगाव आरोग्य केंद्र आणि गटारींच्या कामांचा पाठपुरावा करण्याचा निर्णय

✍️वसंत शिर्के,

मेडगुताड प्रतिनिधी: 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाबळेश्वर शहर व तालुका कार्यकारिणीची बैठक बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी शशीज हॉटेल्स, महाबळेश्वर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहराध्यक्ष शंकररावजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तालुक्यातील विविध विकासकामे, सामाजिक प्रश्न तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस सातारा जिल्हा ओबीसी अध्यक्ष अनिल लोहार, ओबीसी तालुकाध्यक्ष वसंत शिर्के, महाबळेश्वर शहर सचिव इकबाल भाई वलगे, आदिवासी विभागाचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष मारुती केळगणे यांच्यासह पक्षाचे कार्यकारिणी सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत सातारा जिल्हा मुख्यालय येथे २०२६ सालचा दहीहंडी उत्सव आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाबळेश्वर तालुक्यात सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभावाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी सर्व धर्मांचे धार्मिक सण तालुक्याच्या वतीने साजरे करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

दरम्यान, वाई–महाबळेश्वर राजमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने स्थानिक नागरिक तसेच महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महाबळेश्वरचे तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्याचे ठरविण्यात आले.

श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या विकासाचाही मुद्दा बैठकीत महत्त्वाचा ठरला. महाबळेश्वर तालुक्यातील धार्मिक पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता श्री क्षेत्र महाबळेश्वर परिसराचे सुशोभीकरण करणे तसेच या स्थळाला योग्य तो तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळू शकते, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

तसेच दुधगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याच्या मागणीसाठी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

महाबळेश्वर ते वेण्णा लेक परिसरातील अपूर्ण गटारींच्या कामाचा प्रश्नही बैठकीत चर्चिला गेला. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्या लक्षात घेता ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात सविस्तर चर्चा झाली. तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

शेवटी महाबळेश्वर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव इकबाल भाई वलगे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासदांचे आभार मानले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl