‘माझं गाव माझी बातमी’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात
‘माझं गाव माझी बातमी’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात
प्रतापगड प्रतिनिधी :
स्थानिक बातम्यांना व्यासपीठ देत ग्रामीण भागातील विविध प्रश्न, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक घडामोडी आणि विकासकामांना सातत्याने प्रसिद्धी देणाऱ्या ‘माझं गाव माझी बातमी’ या न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास विशाल बोट क्लब, तापोळाचे चेअरमन सुभाष कारंडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच ‘माझं गाव माझी बातमी’चे कार्यकारी संपादक संतोष मालुसरे, कुंभरोशी गावचे माजी सरपंच सखाराम ढेबे, माजी सरपंच रविकांत मोरे, ग्रामपंचायत माजी सदस्य अनिल मोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी प्राथमिक शाळा कुंभरोशीचे मुख्याध्यापक संजय सोंडकर, प्राथमिक शाळा गवडी, ता. जावलीचे मुख्याध्यापक किरण ढेबे, प्राथमिक शाळा तापोळाच्या मुख्याध्यापिका वैशाली कदम, यांनी उपस्थित राहून ‘माझं गाव माझी बातमी’च्या प्रथम वर्धापन दिनास शुभेच्छा दिल्या.
तसेच भाजपचे सनी मोरे, शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख गणेश पवार (लोणंद) आणि शिवसेनेचे अमित जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, वाचक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या वर्षभरात ‘माझं गाव माझी बातमी’ने महाबळेश्वर तालुक्यासह परिसरातील गावागावातील बातम्या, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, पर्यटनविषयक घडामोडी आणि स्थानिक नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. वाचकांचा विश्वास आणि सहकार्य हेच या यशामागील प्रमुख बळ असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
गावाची बातमी, गावकऱ्यांचा आवाज आणि स्थानिक प्रश्नांना न्याय देण्याचा हा प्रवास यापुढेही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
Comments
Post a Comment