शिक्षक समितीच्या जिल्हाध्यक्षपदी किरण यादव; सरचिटणीसपदी संतोष घोडके विषय नियामक सभेत सर्वानुमते निवड; शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे काम करण्याचा नूतन पदाधिकाऱ्यांचा निर्धार

सातारा जिल्हा प्राथमिक 


शिक्षक समितीच्या जिल्हाध्यक्षपदी किरण यादव; सरचिटणीसपदी संतोष घोडके

विषय नियामक सभेत सर्वानुमते निवड; शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे काम करण्याचा नूतन पदाधिकाऱ्यांचा निर्धार

तापोळा प्रतिनिधी : 

सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हाध्यक्षपदी किरण यादव यांची, तर जिल्हा सरचिटणीसपदी संतोष घोडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सातारा येथील शिक्षक बँकेच्या सभागृहात झालेल्या शिक्षक समितीच्या विषय नियामक सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.

मागील जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त झाल्याने जिल्हा कार्यकारिणीत बदल करणे आवश्यक झाले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. विषय नियामक सभेसाठी पक्ष निरीक्षक म्हणून राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील यांनी जबाबदारी पार पाडली.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप कदम, माजी सरचिटणीस संतोष मांढरे, महिला आघाडी प्रमुख सुलभा सस्ते यांची विशेष उपस्थिती होती.

जिल्हा कार्यकारिणीतही महत्त्वाच्या निवडी

नूतन कार्यकारिणीत विश्वंभर रणनवरे यांची जिल्हा शिक्षक नेतेपदी, तातोबा भिसे यांची उपाध्यक्षपदी, शिवाजीराव शिंदे यांची कार्याध्यक्षपदी, तर तानाजी वाघमोडे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष किरण यादव यांनी यावेळी सांगितले.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी किरण यादव यांची झंझावाती कामगिरी

किरण यादव यांनी आतापर्यंत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी केलेले काम, शिक्षकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती तसेच संघटनेच्या ‘न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन काम करण्याची त्यांची पद्धत यामुळे जिल्ह्यातील सभासदांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. त्यातूनच जिल्हाध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली.

तर संतोष घोडके हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक समितीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

“सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू”

निवडीनंतर बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष किरण यादव म्हणाले, “त्याग आणि सेवा या संघटनेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे कामकाज केले जाईल. शिक्षक समितीच्या सभासदांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहणार आहे.”

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, सेवा-सुविधांशी संबंधित विषय तसेच शिक्षकांच्या अडचणी संघटितपणे शासन व प्रशासनासमोर मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

या निवड प्रक्रियेस सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत बजबळे, सुरेश पाटील, विठ्ठल माने, शिक्षक बँकेचे चेअरमन विशाल कणसे, अनिल पिसाळ, दगडू ढेबे, विठ्ठल फडतरे, बाळकृष्ण कुंभार, मोहनराव सातपुते, विजय जाधव, भुजंगराव यादव, आप्पासाहेब मतकर, हनमंतराव भोईटे, माजी चेअरमन नवनाथ जाधव, पुष्पलता बोबडे, संचालक सुरेश पवार, नितीन फरांदे, नितीन काळे, तानाजी कुंभार, विजय बनसोडे यांच्यासह विविध पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

तसेच तालुका अध्यक्ष आबासाहेब जाधव, वसिम वारूणकर, संतोष कोळेकर, विनायक चव्हाण, संजय नांगरे, तातोबा भिसे, तानाजी यादव, किरण फाळके, संतोष घोडके, ज्ञानेश्वर शिर्के, सचिन पांढरपोटे, जयश्री कदम, सरचिटणीस निलेश कर्वे, सतीश गवळी, उमेश पवार, उमेश माने, राजू संकपाळ, नितीन घनवट, चंद्रकांत जाधव, बाबुराव चव्हाण, शशिकांत शेलार, रवि कुंभार, अंकुश नांगरे, सुभाष शेवाळे, अरुण पाटील, धीरेश गोळे, सेवानिवृत्त शिक्षक शांताराम लेंभे, संभाजी पवार, तानाजी नावडकर, सुरेश सावंत, बबनराव शिंगटे, संजय सरकाळे, उदय घोरपडे, पृथ्वीराज निकम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

नूतन जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस यांच्या निवडीमुळे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार असून, आगामी काळात शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा शिक्षक सभासदांकडून व्यक्त होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl