स्वातंत्र्यदिनाचा अनोखा उपक्रम; वारसोळी कोळी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट


स्वातंत्र्यदिनाचा अनोखा उपक्रम; वारसोळी कोळी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट

तापोळा प्रतिनिधी : 

तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारसोळी कोळी आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त अजिंक्यतारा निसर्गप्रेमी ग्रुप, सातारा यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शाळा व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस, स्कूल बॅग तसेच विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी संगीत कवायत तसेच देशभक्तीपर गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचे आणि मनोगतांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

वारसोळी कोळी शाळा दुर्गम भागात असूनही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम उल्लेखनीय असल्याचे उपस्थितांनी सांगितले. शाळेला आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन मान्यवरांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमाला अजिंक्यतारा निसर्गप्रेमी ग्रुप, सातारा यांचे सदस्य अनिल मोरे, जय कदम, दत्तात्रय शिवशरण, सचिन पवार, अक्षय मोरे आणि राजेंद्र इंगवले उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हेमलता सावंत, विद्या कदम, शकुंतला कदम, मीरा कदम, शिल्पा कदम, रुपाली कदम, अशोक शेलार आणि प्रशांत कदम यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक विक्रम सावंत यांनी केले, तर विकास कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून त्यांच्या शिक्षणाला बळ देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला असून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती ठरली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl