कुसुंबी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; वीरांच्या शौर्याला मानवंदना देत ‘शौर्य फलकाचे’ अनावरण
कुसुंबी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; वीरांच्या शौर्याला मानवंदना देत ‘शौर्य फलकाचे’ अनावरण
✍️संतोष मालुसरे,
तापोळा प्रतिनिधी : वेण्णा दक्षिण विभागाचे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुंबी येथील श्री काळेश्वरी देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी वीर जवानांच्या शौर्य व बलिदानाची आठवण जागविणाऱ्या ‘शौर्य फलकाचे’ अनावरण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रीक्षेत्र कुसुंबीची माहेरवाशीण तसेच वीर पत्नी सौ. वैशाली रवींद्र धनावडे-वेंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘शौर्य फलकाचे’ अनावरण करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे स्वातंत्र्यसैनिक तसेच देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला यावेळी अभिवादन करण्यात आले. तिरंग्याला मानवंदना देताना विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.
“ज्यांच्या त्यागाने स्वातंत्र्याची पहाट उजाडली,
त्यांच्या शौर्याला शतशः नमन!” 🇮🇳
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यामागील संघर्ष, वीरांचे बलिदान आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व समजावून देण्यात आले. ‘शौर्य फलक’ हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार असून, देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कार्याची सतत आठवण करून देणारा ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. किसनराव चिकणे, उपाध्यक्ष श्री. बाजीराव चिकणे, सचिव श्री. जगन्नाथ चिकणे, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. विजय वेंदे, श्री. रामदास वेंदे, ज्ञानेश्वर चिकणे, संस्थेचे संचालक श्री. चंद्रकांत वेंदे, श्रीकृष्ण चिकणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. जनार्दन गुरव, अजय कुंभार, सचिन वेंदे, नेहरू युवा मंडळाचे कार्यकर्ते, पत्रकार जितीन वेंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. लोहार सर, शिक्षक घोरपडे सर, आरु सर, कोमल वेंदे, संतोष चिकणे, आजी-माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि वीरांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली. शौर्य आणि त्यागाची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
जय हिंद! 🇮🇳
जय महाराष्ट्र! 🚩
Comments
Post a Comment