भर पावसातही देशभक्तीचा उत्साह कायम! कुंभरोशीत ठिकठिकाणी ध्वजारोहण प्राथमिक शाळेपासून हायस्कूलपर्यंत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष; ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षकांची मोठी उपस्थिती

 

भर पावसातही देशभक्तीचा उत्साह कायम! कुंभरोशीत ठिकठिकाणी ध्वजारोहण

प्राथमिक शाळेपासून हायस्कूलपर्यंत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष; ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षकांची मोठी उपस्थिती

कुंभरोशी प्रतिनिधी : 

मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाही देशभक्तीचा उत्साह तसूभरही कमी न होता महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील विविध शासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक शाळा, कुंभरोशी येथून करण्यात आली. भर पावसात ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्रित आले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर सर्वांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले. यावेळी राष्ट्रगान, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. पावसाच्या सरी सुरू असतानाही विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीचा जागर केला.

यानंतर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथेही ध्वजारोहण करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचा समारोप श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, कुंभरोशी येथे ध्वजारोहणाने झाला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमास सरपंच कांचन सावंत, माजी सरपंच सखाराम ढेबे, सचिन सकपाळ, प्रताप दाभेकर, विठ्ठल मोरे, सुभाष सावंत, सनी मोरे, बाळासाहेब पार्टे, अजित कारंडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय सोंडकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण मोझर यांच्यासह दोन्ही शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भर पावसातही ध्वजारोहणासाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग हा गावातील देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधोरेखित करणारा ठरला. पावसाच्या सरींमध्ये फडकणारा तिरंगा आणि राष्ट्रगीताच्या स्वरांनी कुंभरोशीचा परिसर देशभक्तीने भारावून गेला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl